मुंबई | एसटी (ST)महामंडळाचं राज्य शासनात विलीनीकरण करावं, यासाठी सुरू असलेल्या असलेल्या संपाबाबत मुंबई हायकोर्टात (Mumbai Hight Court) काल पुन्हा सुनावणी झाली. या सुनावणीत महत्त्वाचा निर्णय सांगण्यात आला आहे. त्यामुळे आता हा संप मिटणार का? याकडे सगळ्यांच लक्ष लागून आहे.
संपकरी एसटी महामंडळ कर्मचाऱ्यांनी 15 एप्रिलपर्यंत कामावर रुजू व्हावं, त्याप्रमाणे ते कामावर रुजू झाले नाही तर राज्य सरकार कायद्याप्रमाणे कारवाई करण्यास मोकळे आहे, असा निर्णय मुंबई हायकोर्टानं सुनावला आहे. अशातच आता दिलासादायक बातमी समोर आली आहे.
एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावर आज पुन्हा एकदा हायकोर्टामध्ये सुनावणी पार पडली. या सुनावणीत त्यांनी कर्मचाऱ्यांचा कामावर रुजू होण्याचा कालावधी वाढवला आहे. 22 एप्रिलपर्यंत कामावर रुजू होण्याची सूचना हायकोर्टाने दिली आहे.
दरम्यान, संपकरी कर्मचारी संप मिटवून कामावर रुजू होण्यास तयार असतील तर त्यांना कारवाईच्या भीतीविना रुजू होऊ द्या, असं मुंबई हायकोर्टानं म्हटलं आहे.
थोडक्यात बातम्या –
मोठी बातमी! राष्ट्रवादीत इनकमिंग सुरूच, प्रसिद्ध अभिनेत्रीचा राष्ट्रवादीत प्रवेश
“फडणवीसांनी सोमय्यांना जोडे मारले पाहिजेत, तेच वकिली करत आहेत”
संजय राऊतांच्या टीकेला अमित शहांचं जोरदार प्रत्युत्तर, म्हणाले…
“अचानक अमेरिकेच्या कडेवरून उतरून रशियाच्या मांडीवर जाऊन बसल्यामुळेच…”
“…मग नवाब मलिक तुरूंगात असताना पंतप्रधानांना भेटण्याची तत्परता का नाही दाखवली? “
Comments are closed.