बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“हे सगळं महाराष्ट्रासाठी अशोभनीय…”; सुप्रिया सुळे मुख्यमंत्र्यांवर संतापल्या

मुंबई । महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाचा वाद शिगेला पोहोचला आहे. त्यातच यावर्षी दसरा मेळावा कोणाचा होणार यासाठी नवा वाद सुरु झालाय. शिवाजी पार्कवरच मेळावा व्हावा यासाठी एकनाथ शिंदे गट (Shinde Group) आणि शिवसेना (Shivsena) गटाकडून मोठ्या प्रमाणावर प्रयत्न सुरू आहेत.

या सर्व प्रकरणावर विविध स्तरांतुन टीकास्त्र सोडण्यात येतंय. विविध पक्षांकडून आपली मतं मांडण्यात येत आहेत. राष्ट्रवादीच्या (NCP) खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी देखील आता यावर आपलं मत व्यक्त केलंय.

माध्यमांशी बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या, ‘आमच्याही काळात दसरा मेळावा व्हायचा. तेव्हा आमच्या विरोधातही भाषणं व्हायची. पण आम्ही ती उत्सुकतेने ऐकायचो. पण आत्ता जे प्रकरण सुरू आहे हे सर्व महाराष्ट्रासाठी अशोभनीय आहे.’ दरम्यान, ‘मुख्यमंत्री पद मोठं असतं आणि ते सर्वसमावेशक असायला हवं.’ असा टोलाही त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना (CM Eknath Shinde) लगावला

विरोधक दिलदार असावा विरोधक दिलदार नसेल तर राजकारणात मजा कशी येणार? जेव्हा शरद पवार मुख्यमंत्री होते त्यावेळी बाळासाहेब ठाकरे दिलदारपणे शिवाजी पार्कवरुन पवारांवर टीका करायचे. असंही त्या म्हणाल्या.

थोडक्यात बातम्या-

समांथा सामना करतेय ‘या’ गंभीर आजाराचा, चित्रपटाच्या शूटिंगमधूनही घेतला ब्रेक

‘सारा, तारा, अनन्या आणि राधिका या…’, जान्हवी कपूरचं वक्तव्य चर्चेत

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More