बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“हा मोदींचा नवीन भारत आहे, इथे गुन्हेगारांना दंड दिला जातो मग तुमचा बाप कोणीही असो”

मुंबई | अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला मुंबई क्रुझ ड्रग्स प्रकणात अटक करण्यात आलं आहे. त्याला एक दिवसाची एनसीबी कोठडी सुनावण्यात आली. आज यावर सुनावणी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आर्यनच्या अटकेनंतर वेगवेगळ्या क्षेत्रातून प्रतिक्रिया उमटल्याचं पहायला मिळतय. अशातच आता या ड्रग्स प्रकरणामुळे राजकीय वातावरणही तापलेलं दिसत आहे.

राज्यात कडक निर्बंध असूनही वारंवार अशा प्रकारच्या ड्रग्स पार्ट्या होत असल्यामुळे महाविकास आघाडी सरकारवर टीका केली जात आहे अशातच आता भाजप अध्यात्मिक समन्वय आघाडीचे प्रदेशाध्यक्ष आचार्य तुषार भोसले यांनीही या मुद्द्यावरुन सरकारला घेरलं आहे.

‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली बदललेला हा नवा भारत आहे. इथे गुन्हेगारांना शोधून दंड दिला जातो मग तुमचा बाप कोणीही असो. एनसीबी ठाकरे सरकारच्या अखत्यारीत येत नाही म्हणून बरं, नाहीतर रातोरात ‘त्या’ची ‘मन्नत’ पूर्ण झाली असती,’ असा टीकास्त्र भोसले यांनी सरकरारवर सोडलं आहे.

दरम्यान, आर्यन खानवरुन वातावरण चांगलंच तापलं असून अनेक बड्या नेत्यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. आर्यनमुळे आता शाहरुख खानच्याही अडचणी वाढल्या आहेत. त्यामुळे आता हे प्रकरण आणखी काय वळण घेईल हे पाहण महत्वाचं ठरणार आहे.

थोडक्यात बातम्या – 

‘या’ कारणामुळे प्रियंका गांधी पोलिसांच्या ताब्यात, काय आहे प्रकरण?

शाहरुखला सपोर्ट करण्यासाठी सलमान धावला, रात्री उशिरा मन्नतवर पोहोचला

आर्यन खानच्या जामीनाबाबत ‘ही’ महत्त्वाची माहिती आली समोर

“राज्य सरकारची अवस्था आंधळं दळतं आणि कुत्रं पीठ खातं अशी झाली आहे”

पूरग्रस्तांचे सांत्वन हा तर मुखवटा; फडणवीसांच्या दौऱ्यावरून संजय राऊत म्हणाले…

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More