बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

गुंतवणूकदारांना मोठा फटका! सेनसेक्समध्ये सहा महिन्यातील सर्वात मोठी घसरण

मुंबई | राज्यात शेअर बाजारात गेल्या काही दिवसापासून मोठी तेजी दिसून येत होती. मात्र बुधवारी 270 अंकांनी घसरलेला शेअर बाजारात आज तब्बल 1159 अंकांनी घसरला आहे. त्यामुळे मुंबई शेअर बाजाराचा प्रवास आता उलट्या दिशेने सुरू झाला आहे की काय? असं चित्र सध्या दिसत आहे. शेअर बाजारातील मागील 6 महिन्यांमधील ही सर्वात मोठी घसरण झाल्यामुळे गुंतवणुकदार सध्या चिंतेत सापडले आहेत.

बुधवारी शेअर बाजार सुरू होताच बाजार 300 अंकांनी घसरलेला सेन्सेक्स त्यानंतर तो सावरू शकलाच नाही. सायंकाळी बाजार बंद होताच तो 1159 अंकांनी घसरण झाली आणि तो शेवटी 60 हजारांच्या खाली स्थिरावला. बाजार बंद होताना आकडा 59 हजार 985 अंक इतका खाली उतरला. तसेच निफ्टीमध्ये देखील 1.77 टक्क्यांची घट दिसून आली. त्यामुळे निफ्टी 322 अंकांनी खाली घसरून बाजार 17 हजार 857 अंकांवर स्थिरावला.

शेअर बाजार इतक्या मोठ्या अंकांनी कोसळ्यानंतर त्यामध्ये अनेक गुंतवणुंकदाराचं नुकसान झालं आहे. हेवीवेट फायनान्स आणि आयटी क्षेत्रातील मोठ्या घडामोडींमुळे देशांतर्गत इक्टिटीची विक्री झाली. त्यामुळे त्यांचा परिणाम मुंबई बाजारात दिसून आला. यामुळे देशातील गुंतवणूकदारांचं जवळपास तब्बल  4.5 लाख कोटीचं नुकसान झालं आहे, असं रिलायन्स सेक्युरिटीजचे स्ट्रॅटेजी प्रमुख विनोद मोदी यांनी सांगितलं.

दरम्यान, मुंबईचा शेअर बाजार कोसळ्यानंतर आज आयटीसी, आयसीआयसीआय बॅंक, कोटक बॅंक, अॅक्सिस बॅंक आणि टायटन यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. त्यामुळे त्यांचे शेअर्स जवळपास 5.54 टक्क्यांनी खाली आले आहेत.

थोडक्यात बातम्या-

“मी गुडघ्यावर बसण्यास तयार”, अखेर क्विंटन डिकाॅकची माघार

‘…म्हणून पाकिस्तान जिंकल्यावर मी स्टेटस ठेवलं’; माफी मागत नफीसानी सांगितलं कारण

‘अटकेपूर्वी 3 दिवस आधी…’; समीर वानखेडेंना मुंबई उच्च न्यायालयाचा मोठा दिलासा

“ड्रग्ज हे जीवनाश्यक, ड्रग्जचा वापर करण्यास परवानगी दिली पाहिजे”

मोठी बातमी! अखेर आर्यन खानला जामीन मंजूर; मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More