नांदेड महाराष्ट्र

एमआयएमचा डोळा असलेली ‘ही’ महाराष्ट्रातील एकमेव ग्रामपंचायत

नांदेड | सध्या महाराष्ट्र राज्यात ग्रामपंचायत निवडणुकींचं वारं घुमत आहे. त्यामुळं सगळीकडे सर्व पक्षांची जोरदार तयारी सुरु झाली आहे. याच पार्श्वभूमीवर नांदेडशहराजवळ असलेल्या वाजेगाव या ग्रामपंचायत सर्वाधिक चर्चेत असून, यंदाच्या ग्रामपंचायत निवडणुकीत एमआयएम पक्ष आपले पॅनल उभे करणार आहे.

वाजेगावची ओळख काँग्रेसचा बालेकिल्ला अशी आहे. साडे आठ हजार मतदार असलेल्या वाजेगावात 17 सदस्य निवडून द्यायचे आहेत. तसेच मुस्लिम बहुल असलेल्या या गावात एमआयएमच्या प्रवेशामुळे रंगत आली आहे.

राजकीयदृष्ट्या हे गाव अत्यंत महत्त्वाचं आहे. या निवडणूकीत काँग्रेस आणि एमआयएममधी लढाई चांगलीच चुरशीची होणार आहे.

दरम्यान, निवडणूक आयोगाने ग्रामपंचायत सदस्य होण्यासाठी किमान सातवी पासची अट घातली आहे. कोरोना संकट आणि लॉकडाऊनमुळे रखडलेल्या जवळपास 14 हजार ग्रामपंचायतींच्या निवडणुका 15 जानेवारीला प्रत्यक्ष होणार आहे. त्यासाठी 23 डिसेंबरपासून अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे.

थोडक्यात बातम्या-

रामाला मानणारे वचन कसे मोडतात- अण्णा हजारे

“अशोक चव्हाणांची हकालपट्टी करा आणि त्यांच्या जागेवर…”

फेसबूक पोस्ट करत महिलेचा अमिताभ बच्चन यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली…

मी परत जाईन, परत जाईन म्हणायला त्यांना कोणी बोलावलंही नव्हतं- अजित पवार

धक्कादायक! ‘या’ लोकप्रिय अभिनेत्याचा धरणात बुडून मृत्यू

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या