मुंबई | केंद्र सरकारच्या नव्या कृषी कायद्यांविरोधात दिल्लीमध्ये गेल्या 70 दिवसांपासून शेतकरी आंदोलन सुरू आहे. अशातच परदेशातील पॉपस्टार रिहानाने शेतकरी आंदोलनाला पाठींबा दिला आहे. तिच्या ट्विटनंतर भारतीयांनी तिच्याविषयी जाणून घेण्यासाठी गुगलवर तिच्याविषयी शोध घेतला आहे.
रिहानाने शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देताना जे ट्विट केलं होतं ते ट्विट भारतीय पाहत आहेत. त्यानंतर रिहाना मुसलमान आहे का?, आणि रिहाना पाकिस्तानी आहे का?, हे दोन प्रश्न भारतीयांनी सर्वाधिक सर्च केले.
रिहानाने शेतकरी आंदोलनासंदर्भातील एक लेख शेअर करत, ‘आपण याबाबत का बोलत नाही आहोत?’, असं ट्विट केंल होतं. यानंतर 3 फेब्रुवारीला रात्री 12 वाजता रिहनाला गुगलवर सर्च करायला लोकांनी सुरूवात केली.
दरम्यान, रिहानाबाबत सर्च केलेल्या विषयांमध्ये तिची संपत्ती, तिचं ट्विटर अकाउंट, इन्स्टाग्राम अकाउंट आणि रिहाना इंडिया फार्मर हे विषय होते.
थोडक्यात बातम्या-
रात्री गावी जाण्याची सोय नव्हती; तरुणांनी केलेल्या प्रकारानं एसटी महामंडळाची झोप उडाली!
…ही सवय आता बदलली पाहिजे; ज्योतिरादित्य शिंदेंची शरद पवारांवर जोरदार टीका
आपण बेसावध न राहता सावधगिरी बाळगण्याची गरज- उद्धव ठाकरे
“शेतकऱ्यांच्या विरोधात बोलणाऱ्या सचिन तेंडुलकरचा ‘भारतरत्न’ काढून घ्या”
चुलता पंतप्रधान असताना भाजपनं पुतणीला तिकीट नाकारलं, वाचा सविस्तर!