बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

लाईव्ह मॅचदरम्यान या व्यक्तीने महिलेसोबत केलं वाईट कृत्य; व्हिडीओ व्हायरल

नवी दिल्ली | सध्या इंग्लंडमध्ये ‘वाइटैलिटी ब्‍लास्‍ट’ ही देशांतर्गत क्रिकेट टुर्नामेंट चालू आहे. जगभरातील अनेक खेळाडू या टुर्नामेंटमध्ये आपल्या उत्तम खेळीचं प्रदर्शन करताना दिसत आहेत. मात्र, सध्या सोशल मीडियावर या टुर्नामेंटमधील एक खळबळजनक व्हिडीओ व्हायरल होत आहे.

व्हायरल होणाऱ्या या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती सामन्यादरम्यान महिला प्रेक्षकासोबत चुकीचं वर्तन करताना दिसत आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर लोक यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देऊ लागले आहेत.

सरे आणि मिडलसेक्स या दोन संघांमध्ये क्रिकेटचा सामना रंगला होता. सामन्यादरम्यान कॅमेरामॅनने प्रेक्षकांवर कॅमेरा वळवला. नेमकं त्याचवेळी एक व्यक्ती एका महिला प्रेक्षकासोबत चुकीचं वर्तन करताना पकडला गेला. निळ्या रंगाचा ड्रेस घातलेली एक महिला शेजारी बसलेल्या पुरुषाच्या खांद्यावर टेकली होती. महिला खांद्यावर टेकल्यानंतर पुरुष त्या महिलेच्या प्रायवेट पार्टवर कीस करताना व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये दिसत आहे.

दरम्यान, जॉर्डना होल्म्स नावाच्या व्यक्तीने हा व्हिडीओ ट्वीटरवर शेअर केला आहे. लोक या व्हिडीओवर कमेंट करत वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. तसेच काही लोक व्हिडीओ पाहिल्यानंतर तीव्र संताप व्यक्त करत आहेत.

पाहा व्हिडीओ – 

थोडक्यात बातम्या –

भारतात टिकटॉक पुन्हा दाखल होणार, ‘या’ नव्या नावासह परतण्याची शक्यता

कोरोनाचं हाॅटस्पाॅट ठरलेल्या ‘या’ जिल्ह्यात जानेवारीनंतर सर्वात कमी रूग्णांची नोंद

‘संजय राऊतांनी ‘हे’ काम बंद करावं’; देवेंद्र फडणवीसांचा राऊतांना सल्ला

शाब्बास पुणेकरांनो! कोरोनाचं हॉटस्पॉट ठरलेल्या पुण्याने अखेर करुन दाखवलं, वाचा आजची आकडेवारी

राज कुंद्राच्या समर्थनार्थ उतरली गहना; एकता कपूरचं नाव घेत म्हणाली…

Shree

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More