बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘तिसरी लाट आलीच तर ती…’; Omicron बाबत दिलासादायक माहिती समोर

नागपूर | कोरोनाचा नवीन व्हेरीयंट ओमिक्रॉनने (Omicron) पुन्हा एकदा चिंता वाढवली आहे. ओमिक्रॉनबाबत रोज नवनवीन बातम्या समोर येत आहेत. त्यामुळे देशातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. मात्र आता ओमिक्रॉनबाबत चिंता कमी करणारी माहिती समोर आली आहे. क्रिम्स हॉस्पिटलचे प्रबंध संचालक आणि विदर्भ हॉस्पिटल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. अशोक अरबट (Dr. Ashok Arbat) यांनी माहिती दिली आहे.

तिसरी लाट आलीच तर ती मुलांवर आघात करण्याची शक्यता कमी आहे. शिवाय इतरांसाठीही ती फार घातक ठरणार नाही. रुग्णालयात दाखल होणाऱ्यांचे प्रमाण कमी राहील. मात्र तिसरी लाट आली तर मधुमेह व इतर गंभीर आजार असणाऱ्यांनाच अधिक धोका होऊ शकतो, अशी माहिती डॉ. अरबट यांनी पत्रकारांशी बोलताना दिली आहे.

ओमिक्रॉनच्या आजवरच्या अभ्यासानुसार, ओमिक्रॉन सौम्य स्वरूपाचा आहे. त्यामुळे रुग्णसंख्या वाढली तरी त्यामुळे फार नुकसान संभावत नाही, असंही त्यांनी सांगितलं आहे. शिवाय कोव्हिडचे हे चक्र न संपणारे आहे. त्यामुळे आता प्रत्येकाला बुस्टर डोस घेण्याची गरज असल्याचंही अरबट यांनी यावेळी सांगितलं आहे.

दरम्यान, कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेतील क्रिम्समध्ये दाखल रुग्णांचा आभ्यास करण्यात आला होता. त्या अभ्यासाची पाहणी करून काढलेला निष्कर्षातून डॉ. अरबट यांनी ही माहिती दिली आहे. एकंदरीतच डॉ. अरबट यांनी दिलेल्या माहितीमुळे अनेक नागरिकांची चिंता कमी होणार आहे.

थोडक्यात बातम्या-

“उद्धव ठाकरे आजारी आहेत तोपर्यंत देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री करावं”

एसटी कर्मचाऱ्यांवरील कारवाई मागे घेणार का?, अनिल परबांनी स्पष्टच सांगितलं

भारतीयांची चिंता मिटली! Omicronबाबत दिलासादायक माहिती समोर

“पोलीस काय त्यांच्या बापाचे आहेत का? महाराष्ट्राचा बंगाल होऊ देऊ नका”

‘…तो कुत्रा म्हणजे भास्कर जाधव’, विधानसभेत पुन्हा एकदा राडा

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More