बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

चिंताजनक! डेल्टा प्लसनंतर कोरोना रूग्णांमध्ये वाढतोय ‘हा’ नवा धोका

नवी दिल्ली | देशात कोरोना महामारीच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातलं होतं. मात्र गेल्या काही दिवसांपासून आकडेवारीमध्ये लक्षणीय घट होताना दिसत आहे. परंतू डेल्टा प्लसने सर्व देशवासियांची चिंता वाढवली आहे. डेल्टा प्लसच्या रूग्णांमध्ये वाढ होताना दिसत आहेत. अशातच रेक्टल ब्लीडिंगचा धोका वाढला आहे.

राजधानी दिल्लीमध्ये रेक्टल ब्लीडिंगचे पाच रूग्ण आढळून आले आहेत. त्यातील एकाचा मृत्यु झाल्याची माहिती समजत आहे. मृत्यु झाल्याने धोका वाढला आहे. गंगाराम रुग्णालयात या रुग्णांवर उपचार सुरु होते. कोरोनाची लागण झाल्यानंतर 20 ते 30 दिवसांनंतर रेक्टल ब्लीडिंगचा त्रास होण्यास सुरुवात झाली.

कमी प्रतिकारशक्ती असलेल्या कर्करोग, एड्सनं ग्रस्त या रूग्णांमध्ये रेक्टल ब्लीडिंग दिसून आलं होतं. मात्र आता पहिल्यांदाच कोरोनारूग्णांमध्ये हा आजार दिसून आला आहे. याबाबत गंगाराम येथील इंस्टिट्यूट ऑफ लिव्हर गॅस्ट्रोएंटरोलॉजी अँड पॅन्क्रियाटिकोबिलरी सायन्सेसचे चेअरमन प्रोफेसर अनिल अरोरा यांनी माहिती दिली.

दरम्यान, रेक्टल ब्लीडिंग हे सायटोमेगालो व्हायरसशी निगडीत असून रेक्टल ब्लीडिंगचा त्रास होताना रूग्णांच्या पोटात दुखणं, मलस्त्रावाच्या रक्त जाणं ही लक्षणे आढळून आली आहेत.

थोडक्यात बातम्या- 

“भाजपमधील काहीजणांचं मानसिक संतुलन बिघडलं, त्यातील एक पडळकर”

‘हा’ जिल्हा झाला कोरोनामुक्त?; आज एकाही रुग्णाचा मृत्यू नाही, तर अवघ्या 25 नव्या बाधितांची नोंद 

निष्काळजीपणा! कामावर डॉक्टर न आल्यामुळे 12 कोरोना रूग्णांचा ऑक्सिजनअभावी मृत्यू

अखेर त्याने करून दाखवलं! विदर्भाच्या तरुणाला मिळाली लंडनची स्कॉलरशिप

“अजित पवार आणि अनिल परबांचे मनसुख हिरेन आणि स्फोटक प्रकरणातील वाझेशी संबंध”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More