बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

सावधान! कोरोना रुग्णांमध्ये आढळलं ‘हे’ नवीन गंभीर लक्षण

नवी दिल्ली | कोरोनाची दुसरी लाट ओसरल्याचं चित्र असतानाच आता कोरोनाच्या डेल्टा प्लस व्हेरिएंटने चिंता वाढवली आहे. तसेच कोरोनाची नवी लक्षणं समोर येत आहेत. दिल्लीत पाच कोरोना रुग्णांमध्ये गंभीर लक्षण आढळून आलं आहे.

कोरोना रुग्णांना साइटोमेगॅलोवायरसचा त्रास होत असल्याचं समोर आलं आहे. साइटोमेगॅलोवायरसचा त्रास सुरू झाल्यावर विष्ठेसोबत रक्त पडत असल्याचं समोर आलं आहे. आता साइटोमेगॅलोवायरसमुळे चिंतेत आणखी भर पडली आहे.

हे रुग्ण पोटदुखी आणि विष्ठेसोबत रक्त पडत असल्याची समस्या असल्यानं रुग्णालयात आले होते. कोरोनाची लागण झाल्यानंतर 20 ते 30 दिवसांनंतर त्यांना हा त्रास सुरू झाला, अशी माहिती दिल्लीतल्या सर गंगाराम रुग्णालयाचे डॉ. अनिल अरोरा यांनी दिली.

डेल्टा व्हेरिएंटमुळे देशात कोरोनाची दुसरी लाट आली. आता डेल्टा प्लस व्हेरिएंटमुळे तिसऱ्या लाटेचा धोका निर्माण झाला आहे. मात्र कोरोनाची तिसरी लाट नेमकी कधी येईल हे आता निश्चित सांगता येणार नाही, असं कालच कोरोना टास्क फोर्सचे सदस्य असलेल्या डॉ. व्ही. के. पॉल यांनी म्हटलंय. तसेत देशात सध्या डेल्टा प्लसचे 48 रुग्ण आहेत.

थोडक्यात बातम्या- 

‘ही’ लस कोरोनाच्या सर्व व्हेरिअंटवर प्रभावी; अमेरिकेच्या राष्ट्रीय आरोग्य संस्थेचा दावा

“ज्या पवारांनी त्यांची जात काढली, त्यांच्या खांद्यावर डोकं ठेवून राजू शेट्टींना अश्रू ढाळावे लागतायत”

‘केंद्राच्या परवानगीनंतरच सगळी कामं करता का?’; उच्च न्यायालयाने राज्य सरकारला झापलं

महाराष्ट्रात नव्या विधानसभा अध्यक्षपदासाठी ‘हे’ नवीन नाव चर्चेत

‘4 पेक्षा अधिक वेळा पैसे काढल्यास…’; स्टेट बॅंकेच्या खातेदारांसाठी महत्वाची बातमी

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More