बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“सत्तासंघर्षाचा निकाल पुढील पाच वर्षे लागणार नाही”; शिंदे गटाच्या नेत्याचे वक्तव्य

मुंबई | शिवसेना (Shivsena) पक्ष आणि शिंदे सरकार यांचे भवितव्य सर्वोच्च न्यायालयाच्या (Supreme Court of India) हातात आहे. आज त्यावर सुनावणी देखील होणार आहे. त्याच पार्श्वभूमीवर शिंदे गटाचे प्रतोद भरत गोगावले (Bharat Gogawale) यांनी खळबळजनक वक्तव्य केले आहे.

रत्नागिरीत जाहीर सभेत बोलताना गोगावले म्हणाले, सत्तासंघर्षाचा निकाल पुढील पाच वर्षे लागणार नाही. त्यांच्या या वक्तव्यामुळे आता सर्वांच्या भूवया उंचावल्या आहेत. त्यांनी यावेळी शिवसेनेवर टीका देखील केली.

आमचे आमदार अपात्र होण्यासाठी लोकांंनी देव पाण्यात ठेवले आहेत. आगामी 2024 ची विधानसभा निवडणूक आम्ही बहुमताने जिंकू, असा दावा देखील गोगावले यांनी यावेळी केला आहे.

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More