मुंबई | कोरोनाने जगभरात हैदोस घातला होता. कोरोनाचा आता कुठे प्रादुर्भाव कमी झाला आहे. मात्र कोरोनाची दुसरी लाट येणार असल्याचं बोललं जात आहे. अशातच औरंगाबादमधून एक दिलासादायक बातमी आहे.
औरंगाबादमधील फुलंब्री हा तालुका करोनामुक्त झाला आहे. गेल्या 14 दिवसांमध्ये या तालुक्यात एकही कोरानाचा रूग्ण सापडला नाही. राज्यातील कोरोनामुक्त होण्याचा मान फुलंब्री तालुक्याला मिळाला आहे. याबाबत आरोग्य खात्याने माहिती दिली असल्याचं समजतंय.
जेव्हा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चालला होता तेव्हा पुणे, मुंबई आणि औरंगाबादमध्ये कोरोना रूग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात होती. या ठिकाणी अनेकदा लॉकडाऊन करण्यात आलं होतं.
दरम्यान, औरंगाबादमध्ये एकूण 46, 293 जणांना कोरोनाची लागण झाली होती. त्यापैकी 44, 563 रुग्ण बरे झाले आहेत. तसेच जिल्ह्यात आतापर्यंत 1096 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
थोडक्यात बातम्या-
“महाराष्ट्रात जर अघोषित आणीबाणी असेल तर मग देशात घोषित आणीबाणी आहे का?”
‘मला तोंड फोडण्याची धमकी दिली होती आणि आता…’; कंगणाचा पुन्हा शिवसेनेवर निशाणा
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांना कोरोनाची लागण
‘अवघ्या सात तासाच्या अधिवेशनात जनतेचे प्रश्न कसे मांडायचे?’; फडणवीसांचा सरकारला सवाल
…तर मुंबईत महापौर भाजपचा आणि उपमहापौर आरपीआयचा- रामदास आठवले
Comments are closed.