बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

कोरोनानं रोखली वारकऱ्यांची वाट, अशी असेल यंदाची वारी!

पुणे | महाराष्ट्रातील लाखो वारकरी संप्रदायासाठी श्रद्धेचा विषय असलेल्या पंढरपूरच्या आषाढी एकादशीच्या वारीबद्दल आज पुण्यात निर्णय घेण्यात आला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज कोरोनाचा आढावा घेण्यासाठी बैठक घेतली. या बैठकीत पालखी सोहळ्याबद्दलही चर्चा झाली. यंदाही पायी वारीला परवानगी नाकारण्यात आली असून मानाच्या 10 पालख्यांना वारीची परवानगी देण्यात आली आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या वर्षीप्रमाणेच यंदाही आषाढी वारीसाठी परवानगी दिलेल्या पालख्या या बसनेच नेण्यात येणार आहेत. राज्य शासनानं याबाबत आदेश नुकताच जारी केला आहे. या आदेशानुसार गतवर्षीप्रमाणेच वारीचं स्वरुप असणार आहे. प्रातिनिधिक स्वरूपात वाखरी ते पंढरपूर दरम्यानचे दीड किलोमीटर अंतरच पायीवारी होणार आहे.

पंढरपूर येथे आषाढी एकादशीसाठी पायी वारीला मंजुरी न देण्यावर शासन ठाम आहे. आषाढीला पालख्या बसमधूनच येणार असल्याचं शासनाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. केवळ वाखरी ते पंढरपूर दीड किलोमीटर दिंडी पायी येणार असून एकादशी दिवशी शहरातील 195 महाराज मंडळींना देवाचे मुखदर्शन मिळणार आहे.

दरम्यान, मानाच्या पालखी सोहळ्याचं आगमन हे दशमीला पंढरपुरात होईल. वाखरीजवळ वाहनं पोहोचल्यानंतर पुढील दीड किलोमिटरचं अंतर प्रतिकात्मक स्वरुपात पायी गाठण्याची परवानगी पालख्यांना देण्यात आली आहे. पंढरपूरचं मंदीर यावेळी दर्शनासाठी खुलं करण्यात येणार नाही, असंही अजित पवारांनी स्पष्ट केलं.

थोडक्यात बातम्या – 

“मोदी सरकारनं जगाला दिलेली शिकवण आधी स्वतः अमलात आणावी”

आनंदाची बातमी! सीरम इन्स्टिट्यूटने तयार केलेली ‘ही’ नवी लस कोरोना व्हेरिएंट्सवर 90% प्रभावी

सुशांतच्या प्रोफाईलवरच्या त्या चित्राने सर्वांना हादरवलं, चित्रामागील थरारक कहाणी वाचून बसेल धक्का

“अजित पवार आणि छत्रपती शाहू महाराजांच्या आजच्या भेटीची कल्पनाच नव्हती”- संभाजीराजे भोसले

संभाजीराजेंच्या आंदोलनाला उदयनराजेंचा ठाम पाठिंबा, म्हणाले….

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More