बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मास्क न घालणाऱ्यांना झेडपी तिकीट नाही- सुप्रिया सुळे

पुणे | कोरोनापासून संरक्षणासाठी सरकारने काही नियम लागू केले आहेत. बाहेर जाताना विनामास्कशिवाय बाहेर पडता येणार नाही. विनामास्क फिरणाऱ्यांवर प्रशासन कारवाई करत आहे. मात्र अनेक ठिकाणी प्रतिनिधी विना मास्क फिरताना दिसतात. असाच काहीसा प्रकार इंदापूरमध्ये राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या पाहण्यात आला. यानंतर त्यांनी कार्यकर्त्यांना तंबी दिली आहे.

काही कार्यकर्ते विनामास्क दिसून आले. ज्या सदस्यांचे तीन वेळा विनामास्क फोटो पुढे येतील, त्यांना तिकीटच देऊ नका, असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे. उपमुख्यमंत्री अजित पवारांचा मास्क येत्या दीड वर्षात खाली आला नाही. आला तरी काही सेकंदात ते पुन्हा घालतात, अशी आठवणही त्यांनी बोलताना करून दिली. इंदापूर तालुक्यातील सपकळवाडी गावात त्या बोलत होत्या.

सुप्रिया सुळेंनी केंद्र सरकारवरही टीका केली. केंद्र सरकारने आमचा खासदार निधी कट केल्यामुळे विकास कामांना अडचण येत असल्याचं सुप्रिया सुळे यांनी सांगितलं. आई किंवा वडील तर काही कुटुंबात दोघांनाही कोरोनाने हिरवल्यामुळे अनेक मुलं अनाथ झाली आहे. अशा प्रतिकूल परिस्थितीत या मुलांना आधाराची खूप आवश्यकता आहे. यासाठी केंद्र आणि राज्य सरकारच्या यंत्रणांनी गांभीर्याने काम करण्याची गरज आहे.

दरम्यान, कोरोनाची दुसरी लाट आता ओसरत असताना दिसत आहे. त्यामुळे नागरिकांनी अजुनही मास्कचा वापर करावा. नाहीतर कोरोनाची लाट ओसरत आहे मग आता कशाला मास्क परिधान करायचा?, असं बेजबाबदारपणे वागू नये. अन्यथा याचा फटका आपल्याला बसू शकतो.

थोडक्यात बातम्या- 

सेमी फायनलचा वचपा काढण्यासाठी विराटसेना सज्ज; 11 शिलेदारांची यादी जाहीर!

आजोबा अरुण गवळीचा नातीला खेळवताना फोटो व्हायरल!

मोठी बातमी! सीबीएसई बोर्डाच्या दहावी आणि बारावीच्या परिक्षांच्या निकालाची तारीख जाहीर

आनंदाची बातमी! पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूट लहान मुलांना ‘या’ महिन्यात लस देण्यासाठी तयार

“या देशात लोकशाही आहे, दंडुकेशाही चालणार नाही”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More