कोल्हापूर | कोल्हापुरात परप्रांतिय कामगारांचा संयम सुटला. उत्तरप्रदेशला जाण्यासाठी हजारो कामगार रस्त्यावर उतरले. या मजुरांना कोणीतरी आज ट्रेन सुटणार असल्याचं सांगितलं होतं. या अफवेने हे कामगार शिरोली एमआयडीसी परिसरातून कोल्हापूरच्या दिशेने चालत आले.
तावडे हॉटेल परिसरात हजारो कामगार एकत्र आल्याने, पोलीस आणि प्रशासनाची एकच तारांबळ उडाली. यावेळी गांधीनगर नाक्यावर पोलिसांचा मोठा बंदोबस्त होता. जिल्हाधिकारी दौलत देसाई,पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख यांनी कामगारांना समजावण्याचा प्रयत्न केला.
कोल्हापूरमध्ये शिरोली, कागल आणि गोकुळ शिरगाव या तीन महत्त्वाच्या एमआयडीसी आहेत. या तिन्ही एमआयडीसीमध्ये हजारो परप्रांतिय कामगार काम करतात.
कोल्हापुरातून आतापर्यंत तीन ट्रेन कामगारांना घेऊन परराज्यात गेल्या आहेत. मात्र आज आणखी ट्रेन असल्याची चुकीची माहिती या कामगारांना कोणीतरी दिली आणि एकच हल्लकल्लोळ झाला.
ट्रेंडिंग बातम्या-
काळा पैसा भारतात आणण्याची मोदींना संधी; शिवसेनेचा सल्लावजा टोला
कदाचित कोरोना विषाणू कधीच संपणार नाही; जागतिक आरोग्य संघटनेने व्यक्त केली भिती
महत्वाच्या बातम्या-
…म्हणून मला उमेदवारी दिली नसेल- चंद्रशेखर बावनकुळे
पक्षासाठी खडसेंचं योगदान मोठं, त्यांच्यावर अशी वेळ येणं दुर्भाग्यपूर्ण- नितीन गडकरी
…म्हणून रणजितसिंह मोहितेंना तिकीट दिलं; चंद्रकांत पाटलांनी सांगितलं कारण
Comments are closed.