Top News पुणे महाराष्ट्र राजकारण

धनंजय महाडिकांच्या मुलाच्या लग्नात सोशल डिस्टंन्सिंगचा फज्जा; शरद पवार, फडणवीस होते हजर

Photo Credit- Twitter/ @mipravindarekar

पुणे | एकीकडे राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जनते समोर येऊन कोरोना परिस्थितीचे गांभीर्य मांडत होते तर दुसरीकडे राजकीय नेते शासकिय नियमांचं उल्लंघन करताना दिसत आहेत. कोल्हापूरचे माजी खासदार धनंजय महाडिक यांच्या मुलाच्या लग्नात हजारोंची गर्दी जमली होती आणि यामुळे सोशल डिस्टंन्सिंगचा फज्जा उडाल्याचं पहायला मिळालं. विशेष म्हणजे या कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारही उपस्थित होते. त्यांच्या समोर हा सर्व प्रकार घडला.

पुण्यातल्या लक्ष्मी लाँन्समध्ये धनंजय महाडिक यांच्या मुलाचं लग्न होतं. या लग्नाला महाराष्ट्रातील दिग्गज नेते उपस्थित होते. शरद पवार, संजय राऊत, देवेंद्र फडणवीस, प्रविण दरेकर, रामदास आठवले, चंद्रकांत पाटील, वंदना पाटील यांच्यासारखे नेत्यांनी लग्न सोहळ्यात हजेरी लावली. लग्नाला मोठी गर्दी जमली होती.

झालेल्या प्रकारामुळे नेत्यांसाठी वेगळा न्याय आणि सामान्य नागरिकांना वेगळा न्याय आहे का?. असा प्रश्न आता सामान्य नागरिक विचारत आहेत.

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे पुण्यात कालपासून रात्री 11 पासून ते सकाळी 6 पर्यत संचारबंदी जाहीर केली आहे. तर पुण्यातल्या शाळा देखील 28 फेब्रुवारी पर्यत बंद ठेवण्याचा निर्णय प्रशासनाकडून घेण्यात आला आहे.

थोडक्यात बातम्या-

‘पक्ष सर्वांनाच वाढवायचा आहे, कोरोना नाही’; मुख्यमंत्र्यांनी सर्व पक्षांना खडसावलं

रुबीना दिलैक ठरली बिग बॉस 14 ची विजेती!

मुंबई महापालिका निवडणूकीसदंर्भात संजय राऊतांचं मोठं वक्तव्य, म्हणाले…

तृणमूल काँग्रेसला धक्का! कोळसा चोरी प्रकरणी सीबीआयने केली ‘ही’ मोठी कारवाई

धक्कादायक! पुण्यात Tiktok स्टार समीर गायकवाडने केली आत्महत्या

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या