बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“धनंजय मुंडेंविरोधात बोलशील तर तुझ्या डोक्यात सहा गोळ्या घालेल”

मुंबई | राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांच्याविरूद्ध रेणू  शर्मा नावाच्या तरूणीने बलात्काराचे आरोप केले आहेत. त्यामुळे मुंडेंनी राजीनामा द्यावा अशी मागणी भाजपचे नेते करत आहेत. याच पार्श्वभूमीवर भाजप नेते किरीट सोमय्या यांना धमकीचे फोन आल्याचं त्यांनी सांगितलं आहे.

रविवारी सकाळी 11.30 वाजता दोनदा धमकीचे फोन आले, सर्व सहा बुलेट्स तुझ्या डोक्यात घालणार, गेल्या 2 दिवसांपासून धमकीचे फोन सुरूच असल्याचं किरीट सोमय्या यांनी मुंबई पोलीस सहआयुक्त विश्वास नांगरे पाटील यांना पत्र लिहित कळवलं आहे. मात्र पोलिसांनी काहीही केले नाही, फक्त एन सी  नोंद केली आहे, असं म्हणत सोमय्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

महेश गिते, जयकांत राख, अक्षय तिडके, राम डोईफोडे, रमेश नागरगोजे या राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी धमकीचे फोन केल्याचा आरोप सोमय्यांनी केला आहे. पोलिसांनी कोणतीही कारवाई न केल्याने सोमय्या यांनी ट्विट करत आपला नाराजी व्यक्त केली आहे.

दरम्यान, किरीट सोमय्या यांनी धनंजय मुंडे यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी निवडणूक आयोगाकडे केली असून मुंडेनी राजीनामा द्यायलाच हवा असं म्हटलं होतं.

 

थोडक्यात बातम्या-

तांडव वेब सीरिजच्या विरोधात लखनौमध्ये FIR दाखल

भास्करराव पेरे पाटलांना मोठा धक्का; पाटोदा ग्रामपंचायतीत सर्वात धक्कादायक निकाल

30 वर्षानंतर निवडणूक; पोपटराव पवारांच्या हिवरे बाजारमध्ये असा लागला निकाल!

“शरद पवारांनी धनंजय मुंडेंची पाठराखण करू नये”

ग्रामपंचायत निवडणुकीचा निकाल आज होणार जाहीर!

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More