पाटणा । एकाच घरातील तीन सख्ख्या बहिणींची फेसबुकवर 3 मुलांसोबत मैत्री झाली होती. या मैत्रीतून प्रेमसंबंध निर्माण झाले आणि तिघीही एकाच दिवशी आपापल्या प्रियकरासोबत पळून गेल्या. हे प्रकरण बिहारमधील बक्सर आणि भोजपूर या गावात घडलं आहे. तिन्ही बहिणी बक्सरच्या असून ज्यांच्यासोबत त्या पळाल्या ती मुलं भोजपूरची आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, व्हेलेंटाईन डेच्या दिवशी हा प्रकार घडला आहे. तिन्ही बहिणीच फरार झाल्या नाहीत तर गावातील आणखी एक मुलगीही आपल्या प्रियकरासोबत फरार झाली आहे. नातेवाईकांनी पोलिसांकडे तक्रार केल्यानंतर पोलिसांनी तिन्ही मुली पाटणामध्ये असल्याचा शोध लावला.
पाटण्यात पोलिसांनी शोध घेतला असता, या चार जोडप्यांपैकी एक जोडपं पोलिसांच्या हाती लागलं. त्यांच्याकडे चौकशी केली असता बाकी जोडपी आरा नावाच्या गावात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली, त्यानंतर पोलिसांनी या गावात जाऊन बाकी जोडप्यांनाही ताब्यात घेतलं.
दरम्यान, मुलीच्या घरच्यांनी याबाबत पोलीस तक्रार केली आहे. तीन बहिणींपैकी दोन अल्पवयीन असल्याने पोलिसांनी त्यांच्या प्रियकरांना अटक केली आहे.
थोडक्यात बातम्या –
मृतदेह घेऊन रुग्णालयात पोहोचली महिला, खरा प्रकार पाहून पोलीसही चक्रावले
वारकरी बाहेर पडले तर सरकारच्या अंगलट येईल, ‘या’ महाराजांनी दिला इशारा
मी वाईट माणूस नाहीये रे…. अभिनेत्रीच्या आरोपावर दिग्दर्शकाचं भावनिक स्पष्टीकरण
संजय राठोड शक्तिप्रदर्शन करणार?, इतक्या हजार लोकांची गर्दी होण्याची शक्यता
पूजा चव्हाण प्रकरणात नवा मेसेज व्हायरल, संजय राठोड यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता