बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“काळ साक्षी आहे, वंशवाद आणि धर्मावर आधारीत असलेली सत्ता टिकत नाही”

पुणे | राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून पिंपरी चिंचवड शहरामध्ये राष्ट्रीय एकता स्नेह संमेलन ईद ए मिलन आयोजित करण्यात आला होता. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद आणि खासदार अमोल कोल्हे उपस्थित होते. अमोल कोल्हे यांनी बोलताना केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल केला.

कोणत्याही वंशवादावर कोणत्याही धर्मवादावर आधारित असलेले राष्ट्र आणि आधारित असलेली सत्ता ही चिरकाल टिकत नाही. काळाची गरज केवळ राष्ट्रीय पातळीवर नाही तर आंतराष्ट्रीय पातळीवर देखील जाणवते. हिटलरने जर्मनी उभा केला होता जो वंशवादावर आधारित होता त्या जर्मनीची काय अवस्था झाली, ती आपण पाहतो, असं अमोल कोल्हे म्हणाले आहेत.

धर्मवादावर उभा राहिलेल्या अफगाणिस्तानची काय अवस्था झाली ती आपण पाहतो. इतकंच नाही तर आपल्या पलिकडचा देश श्रीलंकेमध्ये काय परिस्थिती उद्भवली?, गेल्या पाच दहा वर्षांपूर्वीची श्रीलंकेची परिस्थिती पाहिली तर ज्या राष्ट्रीय समस्या होत्या त्या दिसत होत्या. त्या समस्यांकडे दुर्लक्ष करून लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी वेगवेगळे धार्मिक वाद उफळून काढले जात होते, असं अमोल कोल्हे यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, आज श्रीलंकेची परिस्थिती काय होत आहे. महागाईने जनता त्रस्त झालेली आहे. जनता रस्त्यावर आली आहे. रस्त्यावर आलेली जनता कोणत्याही धर्मासाठी आलेली नाही. पोटाच्या आगीसाठी आलेली आहे. ही पोटाची आग भागवणार शहर कुठलं असेल तर प्रकर्षाने नाव घ्यावं लागत ते पिंपरी चिंचवडचे. हे शहर कुठल्याही जातीच्या आधारावर धर्माच्या आधारावर वसलेलं नाही, असंही अमोल कोल्हेंनी म्हटलं आहे.

पाहा व्हिडिओ-  

थोडक्यात बातम्या- 

‘…म्हणून माझं लग्न होत नाहीये’; कंगनानं स्पष्टच सांगितलं

…म्हणून अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा सोशल मीडियाला रामराम

भाजपला मोठा झटका?; ‘हा’ बडा नेता राष्ट्रवादीत प्रवेश करण्याची शक्यता

मंत्रालयासमोर कुटुंबाचा आत्मदहनाचा प्रयत्न, ‘हे’ धक्कादायक कारण आलं समोर

Gold Rate: सोन्याच्या दरात ‘इतक्या’ रुपयांनी वाढ, वाचा ताजे दर

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More