रोहित शर्माचा असा अफलातून कॅच, ज्याची चर्चा अजूनही सुरु आहे!

तिरुवनंतपुरम | तिसरा टी-20 सामना जिंकत भारताने न्यूझीलंडविरुद्धची मालिकाही खिशात घातली. मात्र या सामन्यात रोहित शर्माने घेतलेल्या कॅचची सध्या चांगलीच चर्चा आहे. 

बुमराने दुसऱ्या षटकातील तिसरा चेंडू फेकला. कॉलिन मुनरोने हा चेंडू टोलवला. चेंडू हवेत होता, मात्र रोहित शर्माला हा कॅच घेणं फारच अवघड होतं. त्याने पुढचा मागचा विचार न करता हवेत सूर मारला आणि हा अवघड कॅच पकडला. 

मुनरोची विकेट भारतासाठी महत्त्वाची होती. कारण राजकोटमध्ये त्याच्या शतकामुळे भारताला पराभवाचा फटका बसला होता. 

पाहा व्हिडिओ-