खासगी वाहनांना प्रवासी वाहतुकीचा परवाना मिळणार?

नवी दिल्ली | खासगी वाहनांना प्रवासी वाहतुकीचा परवाना देण्याचा सरकारचा विचार आहे. रॉयटर्स या वृत्तसंस्थेने सूत्रांच्या हवाल्याने हे वृत्त दिलंय.

शहरांमध्ये मोठ्या प्रमाणावर होणारी वाहतूककोंडी सरकारसाठी नवी डोकेदुखी ठरत आहे, त्यामुळे रस्त्यावरील वाहनांची संख्या नियंत्रित करण्यासाठी सरकार हा निर्णय घेणार असल्याचं कळतंय.

दरम्यान, यासाठी सध्या उबर टेक्नॉलॉजीसोबत एक अभ्यास सुरु आहे, त्यानंतरच हा निर्णय घेतला जाईल. दरम्यान, या निर्णयामुळे सरकारला टॅक्सीचालकांच्या रोषाचा सामना करावा लागू शकतो.

या बातमीवर तुमची कमेंट लिहा