Top News देश

मोफत इनर वेअर देण्यासाठी तरुणींना नको ते करायला लावायचा; पोलिसांकडून अटक

अहमदाबाद | 25 वर्षीय तरुणानं अनेकांना खोट्या कर्ज योजनेअंतर्गत गंडा घातला आहे. त्याचप्रमाणे फ्री इनर वेअर देण्याच्या नावाखाली तो महिलांना अश्लील फोटो आणि व्हिडीओंच्या माध्यमातून धकमवायचा. यामुळं बुधवारी 13 जानेवारी रोजी अहमदाबादमधील सायबर सेलनं या तरुणाला अटक केली.

या घटनेमुळं अहमदाबाद परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अटक करण्यात आलेल्या तरुणाचे नाव सुरज गावळी असून, हा तरुण अहमदाबादमधील चांदखेडा येथील रहिवाशी आहे. अहमदाबाद सायबर क्राइम पोलीस स्थानकामध्ये या मुलाविरुद्ध करण्यात आलेल्या तक्रारीच्या आधारे त्याला अटक करण्यात आली आहे.

हा तरुण फ्री इनर वेअरच्या नावाखाली महिलांची फसवणूक करायचा. एका इनर वेअर ब्रॅण्डच्या जाहिरातीसाठी मोफत कपडे देत असल्याने सांगून हा महिलांचे अर्धनग्न फोटो मागवायचा आणि त्यानंतर या फोटोंच्या माध्यमातून त्यांना धमकवायचा, असंही पोलिसांनी सांगितलं आहे.

असाच प्रकार त्यानं नरोडा येथे एका व्हिडीओ स्टुडीओमध्ये काम करणाऱ्या मुलीसोबत केला.व्हॉट्सअ‍ॅपवरुन या तरुणीला सुरजने आपण इनर वेअर विकणाऱ्या कंपनीचे प्रतिनिधी असून मोफत कपडे हवे असल्यास पत्ता आणि इतर माहिती पाठवावी असं सांगितलं. त्यानंतर आठवडाभराने याच क्रमांकावरुन सुरजने तरुणीकडे कपड्यांची साईज काय आहे यासंदर्भातील माहितीसाठी फोटो पाठवण्यास सांगितले. या तरुणीनं फोटो पाठवल्यानंतर सुरजने न्यूड फोटोंची मागणी केली. याला तरुणीने नकार दिला. मात्र त्यानंतर तरुणीला शंका आल्याने तिनं पोलिसांकडे तक्रार केली.

थोडक्यात बातम्या-

…हे सगळं शरद पवारांचं नाटक; किरीट सोमय्या पवारांवरच संतापले!

अण्णांच्या राळेगण सिद्धीत आचारसंहितेचा भंग; ‘या’ कारणामुळे दोघांवर कारवाई

मीच माघार घेते, तुमचीही तिच इच्छा आहे- रेणू शर्मा

धनंजय मुंडे जात्यातून सुपात; राष्ट्रवादीनं तूर्तास घेतली ‘ही’ भूमिका!

गर्व आहे मला संपुर्ण महाराष्ट्रात मी एकटी मुलगी आहे जी लढत आहे- रेणू शर्मा

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या