Top News पुणे महाराष्ट्र

पुण्यात भयानक वेगानं वाढतोय कोरोना; आजची आकडेवारीही चिंताजनक

पुणे | पुण्यात आज कोरोनामुळे ६३ जणांचा मृत्यू झाला आहे, तर पुण्यात आज दिवसभरात कोरोनाचे सर्वाधिक  २०९३ नवे रुग्ण आढळून आले आहेत.

९१० क्रिटिकल रुग्णांवर सध्या उपचार सुरु आहेत. त्यात ४७८ रुग्ण व्हेंटिलेटरवर उपचार घेत आहेत. तर कोरोनाचा संसर्ग झालेले १५६९ रुग्ण ठणठणीत बरे झाले असून त्यांना आज डिस्चार्ज देण्यात आला आहे.

पुण्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या १०५९०५ झाली आहे. पुण्यातील आताची ॲक्टिव्ह रुग्ण संख्या १६४५३ एवढी आहे. तर आतापर्यंत २५१२ जणांना आपल्या प्राणाला मुकावं लागलं आहे.

आज राज्यात २३,३५० नवीन रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. आता राज्यातील कोरोना बाधित रुग्णांची एकूण संख्या ९,०७,२१२ झाली आहे. तर राज्यात आज रोजी एकूण २,३५,८५७ ऍक्टिव्ह रुग्ण आहेत.

महत्वाच्या बातम्या-

राज्यात कोरोनाचा कहर; दिवसभरात 23 हजार 350 नव्या कोरोना बाधितांची नोंद

काँग्रेसच्या माजी आमदाराला गुंडांकडून बेदम मारहाण, रुग्णालयात नेताना मृत्यू

संजय राऊतांनी कंगणाची माफी मागावी- तृप्ती देसाई

IPL चं वेळापत्रक जाहीर, या दोन संघांमध्ये रंगणार सलामीचा सामना

“हाय प्रोफाईल पार्ट्यांमध्ये कलाकार सर्रास ड्रग्जचं सेवन करतात”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या