बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

पुण्यात आज कोरोनाचे किती रुग्ण सापडले?; वाचा किती रुग्णांचा मृत्यू

पुणे | पुण्यात आज कोरोनामुळे 12 जणांचा मृत्यू झाला आहे, तर पुण्यात आज दिवसभरात कोरोनाचे 99 नवे रुग्ण आढळून आले आहेत.

पुण्यातील डॉ. नायडू रुग्णालय आणि खासगी हॉस्पिटलमध्ये सध्या 1966 कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरु आहेत, तर कोरोनाचा संसर्ग झालेले 61 रुग्ण ठणठणीत बरे झाले असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

76 क्रिटिकल रुग्णांवर सध्या उपचार सुरु आहेत. त्यात 12 रुग्ण व्हेंटिलेटरवर उपचार घेत आहेत. तर 279 रुग्णांवर ससून रुग्णालयामध्ये उपचार सुरु आहेत. पुण्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 2245 झाली आहे.

दरम्यान, राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या आता 19 हजार 063 वर पोहोचली आहे. आज दिवसभरात 1 हजार 089 नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत.

ट्रेंडिंग बातम्या-

कोरोनाचं संकट गंभीर असलं तरीही सरकार खंबीर आहे- उद्धव ठाकरे

स्थलांतरित कामगारांकडून प्रवासी भाडं आकारु नये- प्रकाश आंबेडकर

महत्वाच्या बातम्या-

राज्यात आज कोरोनाचे किती रुग्ण वाढले?; जाणून घ्या सर्व आकडेवारी

“आपल्याला कोरोना विषाणूशी जुळवून जगणं शिकलं पाहिजे”

शिवरायांच्या महाराष्ट्रात लष्कराची गरज नाही- उद्धव ठाकरे

Shree

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More