बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

चेन्नईच सुपर ‘किंग’! चौथ्यांदा पटकावला आयपीएलचा किताब

मुंबई | आयपीएलचा अंतिम सामना आज चेन्नई सुपर किंग्ज आणि कोलकाता नाईट रायडर्स या दोन्ही संघात खेळवला गेला. चेन्नईच्या सलामीवीरांनी चांगली सुरूवात करत कोलकाता समोर 192 धावांचा डोंगर उभारला होता. मात्र दमदार सुरूवातीनंतर देखील कोलकाताला विजय मिळवता आला नाही. त्यामुळे चेन्नईने चौथ्यांदा आयपीएलचा किताब आपल्या नावावर केला आहे.

नाणेफेक जिंकत कोलकाताने चेन्नई संघाला प्रथम फलंदाजी करण्यासाठी आमंत्रण दिलं. कोलकाता प्रथम गोलंदाजीचा निर्णय चेन्नईच्या खेळाडूंनी फेल ठरवला. चेन्नई सुुपर किंग्ज संघाचा फलंदाज फाफ डुप्लेसिसने 86 धावांची वादळी खेळी साकारली. त्याखेळीत त्याने 7 खणखणीत चौकार तर 3 उत्तुंग षटकार ठोकले. गायकवाडने 32 आणि मोईन अलीने 37 धावांचं योगदान दिलं. सुरेश रैनाच्या जागी फलंदाजीला आलेल्या उथप्पाने 31 धावांची छोटेखानी आक्रमक खेळी केली. कोलकाताच्या दोन्ही सलामीवर फलंदाजांनी अर्धशतकी खेळी साकारली.

अंतिम सामन्यात फिरकीपटू सुनील नरेनने 2 बळी टिपले. तर कोलकाताच्या अन्य गोलदांजाना चेन्नईच्या फलंदाजावर अंकुश ठेवता आला नाही. त्यानंतर फलंदाजीला आलेल्या कोलकाताच्या सलामीवीरांनी सुरूवातीला आक्रमक खेळी साकारत 91 धावांची भागिदारी रचली. व्यंकटेश अय्यरने 32 चेंडूत अर्धशतकी खेळी केली. तर शुभमन गिल 51 धावांवर बाद झाला. अखेर 20 षटकात कोलकाताला केवळ 167 धावा करता आल्या. त्यामुळे चेन्नईने 27 धावांनी विजय मिळवला आहे.

दरम्यान, आयपीएल 2021 मध्ये सर्वात जास्त धावा ऋतुराज गायकवाडने 635 धावा काढून त्याच्याकडे ऑरेंज कॅप आहे. त्यानंतर चेन्नईच्या फाफ डुल्पेसिस 633 धावा काढून दुसऱ्या क्रमांकावर आहे. तर बंगळुरु संघाचा गोलंदाज हर्षल पटेलने आयपीेएलमध्ये एका हंगामामध्ये भारतीय गोलंदाजांमध्ये सर्वात जास्त 32 बळी टिपले आहेत. त्यानंतर दिल्लीचा वेगवान गोलंदाज 24 बळीसह दुसऱ्या क्रमांकावर आहे.

थोडक्यात बातम्या- 

छोटा राशिद खान! खुद्द सचिन तेंडुलकरने व्हिडीओ शेअर करत केलं कौतूक; पाहा व्हिडीओ

‘गृहमंत्रिपद म्हटलं की माझा बीपी वाढतो’, अजित पवारांनी सांगितला जयंत पाटलांचा किस्सा

“एकाला बाहेर काढा मग, आपोआप देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील”

मुंबईच्या कोरोना आकडेवारीत कमी अधिक प्रमाणात वाढ, जाणून घ्या आजची आकडेवारी

फॅबुलस ड्युपलेसी! अंतिम सामन्यात फाफची 86 धावांची धमाकेदार खेळी, कोलकाताला ‘इतक्या’ धावांचं लक्ष्य

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More