बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

पुण्यात कोरोनाचा आकडा वाढताच, वाचा आजची आकडेवारी

पुणे | पुणे शहरातील कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याचं पाहायला मिळत आहे. मास्क घातल्याशिवाय घराबाहेर पडू नका सॅनिटायझरचा वापर करा. असं आवाहन प्रशासनातर्फे नागरिकांना वारंवार करण्यात येत आहे. मात्र काही नागरिक बेजबाबदारपणे वागून कोरोनाचा प्रादुर्भाव वाढवण्यास मदत करत आहेत. पुण्यात कोरोना पुन्हा एकदा डोकं वर काढत असल्याचं चित्र आहे. आजची कोरोना रुग्णांची आकडेवारी धक्कादायक आहे.

पुण्यामध्ये आज दिवसभरात 5 हजार 373 रुग्णांची वाढ झाली आहे. तर दिवसभरात 5 हजार 049 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आज कोरोनामुळे 51 जणांना प्राणांना मुकावं लागलं आहे.

पुण्यात सध्या 1196 क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत. पुण्यात एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या 3,54,797 इतकी आहे. तर पुण्यात 54 हजार 624 सक्रिय रुग्ण आहेत. आत्तापर्यंत एकूण 6 हजार 002 जणांचा कोरोनामुळे मृत्यु झाला आहे. आजपर्यंत 2,94,171 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आज 23 हजार 564 जणांची स्वॅब तपासणी करण्यात आली आहे.

दरम्यान, अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने बंद राहणार आहेत. राज्य सरकारच्या निर्देशानुसार पुणे महानगरपालिका हद्दीतील अत्यावश्यक सेवा वगळून सर्व दुकाने बंद असणार आहेत. तसेच राज्य सरकारच्या आदेशाचेही अंमलबजावणी शहरात काटेकोरपणे केली जात आहे.

थोडक्यात बातम्या –

केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांना कोरोनाची लागण

“…तर कोरोनाची दुसरी लाटही आली नसती आणि लोकांचे जीवही गेले नसते”

बस कंडक्टर महिलेची निर्घृण हत्या; बुलडाण्यातील थरकाप उडवणारी घटना

…अन् स्वप्नांचा क्षणातच चुराडा झाला; नववधूला घरी घेऊन जाताना नवरदेवाचा रस्त्यातच झाला मृत्यू

कोरोनाबाधित आईची एक चुक बेतली तिच्या चिमुकलीच्या जीवावर

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More