बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

आज अक्षय्य तृतीया! या दिवसाचं महत्त्व तुम्हाला माहिती आहे का?; जाणून घ्या एका क्लिकवर

पुणे | आज अक्षय्य तृतीया या दिवशी भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मी यांची पूजा केली जाते. या दिवसाला हिंदू संस्कृतीमध्ये अनन्यसाधारण असे महत्त्व आहे. अक्षय्य तृतीयेच्या दिवशी केलेला जप आणि दान हे फळ प्राप्ती देणारे असते असं म्हटलं जातं. अक्षय्य या शब्दाचा अर्थ असा होतो की, ‘कधीही नाश होत नाही असा’. त्यामुळेच त्याला अक्षय्य तृतीया असं म्हणतात.

पद्मपुराण, विष्णू धर्मोत्तर पुराण, मत्स्यपुराण तसेच स्कंदपुराणात अक्षय्य तृतीयेचा विशेष उल्लेख केलेला आढळून येतो. या दिवशी पित्रपूजन  केलं जातं तसेच वैशाख महिना हा भगवान विष्णूचा आवडता महिना असतो, असा समज आहे. त्यामुळे विष्णू आणि देवी लक्ष्मी यांची पूजा देखील केली जाते.

अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने खरेदी मोठ्या प्रमाणात केली जाते. कारण असा समज आहे की, या दिवशी सोने खरेदी केल्याने लक्ष्मी देवी घरात निवास करते. हिंदू धर्मातील साडेतीन मुहूर्तांपैकी एक शुभ मुहूर्त म्हणून अक्षय्य तृतीयेला मान दिला जातो. तसेच या दिवशी अनेक शुभ कामे लोक करताना पाहायला मिळतात. वसंत ऋतुचा शेवट आणि ग्रीष्म ऋतुची सुरुवात म्हणून अक्षय्य तृतीयेची ओळख आहे.

अक्षय्य तृतीयेच्या दिवशी त्रेतायुगाला सुरुवात झाली असं हिंदू धर्मात मानलं जातं तसेच या दिवशी केलेले शुभकार्य हे फलदायी आणि शुभ परिणाम देणारे असतात अशी देखील मान्यता आहे. अशाप्रकारे, अक्षय्य तृतीयेला हिंदू धर्मात खूप महत्त्वाचा दिवस म्हणून मानलं जातं.

थोडक्यात बातम्या –

लजास्पद! ऑक्सिजनसाठी सेक्सची मागणी; सोशल मीडियावर संतापाची लाट

देशातील कोरोना रूग्णसंख्येत घट, पण मृतांचा आकडा चिंताजनक

लशींच्या तुटवड्याला फक्त नरेंद्र मोदी जबाबदार; लसीकरणावरून असदुद्दीन ओवेसी यांची टीका, म्हणाले…

ऐकावं ते नवलच! फॅार्च्युनर गाडीतून वांग्यांची विक्री, पाहा व्हायरल व्हिडीओ-

“गाय मालकावर नाराज झाली, तरी ती खाटीकाच्या घरी जात नाही; आम्ही मोदींसोबत आहोत”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More