बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“बाळासाहेब असते तर उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री होऊ दिलं नसतं”

मुंबई | बंडानंतर अनेक नेत्यांनी वेगवेगळे खुलासे केले. तसेच बंड करण्याची कारणंही सांगितली. यातीलच एक कारण म्हणजे अनेकांना 2019 ची महाविकास आघाडी मान्य नव्हती. यातच शिवसेनेचे माजी पक्षनेते रामदास कदम यांनी पक्षाला राजीनामा दिला. त्यानंतर पक्षविरोधी कारवाईचं कारण सांगून पक्षातून रामदास कदम हकालपट्टी करण्यात आली होती.

रामदास कदम (Ramdas kadam) यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांना अश्रू अनावर झाले होते. काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत आयुष्यभर संघर्ष केला. युतीची ही कल्पना बाळासाहेबांना कधीच आवडली नसती. हे मुख्यमंत्रीपद बाळासाहेबांनाही मान्य झालं नसतं. बाळासाहेब असते तर उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री होऊ दिलं नसतं, असं वक्तव्य त्यांनी केलं आहे.

महाविकास आघाडी स्थापनेला अगदी सुरूवातीपासूनच विरोध होता. राष्ट्रवादीसोबत सत्ता नको अशी हात जोडून विनंती केली होती. ही युती अनैसर्गिक होती. शिवसेना संपवण्याचा प्रयत्न राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) करत आहे. हे देखील मी सांगत होतो. इतकं सांगूनही ऐकलं नाही. त्यामुळेच पक्षावरही वेळ आली आहे, असंही ते म्हणाले

स्थानिक पातळीवर पदाधिकाऱ्यांच्या कामामुळे आम्हाला ही पद मिळाली आहेत. 50 वर्षे मी पक्षाशी प्रामाणिक राहत कामं केलं. सर्व काही उभं करून जर पक्षाकडून अशी हकालपट्टी होत असेल तर हे खूप वेदनदायी आहे. या सगळ्या गोष्टी राष्ट्रवादी काँग्रेस सोबत युती केल्यानं होत आहे, असंही कदम पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले.

थोडक्यात बातम्या

’50 वर्षात उभं केलेलं पत्त्यांच्या बंगल्याप्रमाणे कोसळलं’; रामदास कदम ढसाढसा रडले

‘आता प्रवाहासोबत जावं लागणार’, आणखी एका नेत्याचा शिवसेनेला जय महाराष्ट्र

“सत्तेची भांग प्यायलेले उद्या मातोश्री आणि सेना भवनावर सुद्धा कब्जा करतील”

महाराष्ट्रातील ‘या’ बँकेवर RBI ची मोठी कारवाई; ग्राहकांना झटका

एकीकडे पूरग्रस्तांचे हाल तर दुसरीकडे फोडाफोडीचं राजकारण सुरूये- आदित्य ठाकरे

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More