बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

दिलासादायक! पुण्यात आज नवीन रुग्णांपेक्षा कोरोनामुक्त रूग्णांची संख्या जास्त

पुणे | पुण्यात कोरोनाबाधितांच्या संख्येमध्ये झपाट्याने वाढ होत असली तरी डिस्चार्ज देण्यात येणाऱ्या रूग्णांची संख्या देखील जास्त आहे. आनंदाची बाब म्हणजे आज पुण्यात नव्या रूग्णांची नोंद कमी अन् डिस्चार्ज दिलेल्या रूग्णांची संख्या जास्त आहे.

पुण्यात आज दिवसभरात १,१६४ पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ झाली आहे. तर दिवसभरात २,४०७ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आज कोरोनामुळे ७२ जणांना आपल्या प्राणाला मुकावं लागलं आहे. तर २४ रुग्ण पुण्याबाहेरील आहेत.

पुण्यात सध्या १,३४८ क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत. पुण्यात एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या ४,६२,१७२ इतकी आहे. तर पुण्यात १५,२३२ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. आत्तापर्यंत एकूण ७,८४३जणांचा कोरोनामुळे मृत्यु झाला आहे. आजपर्यंत ४,३९,०९७जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आज १०,८०६जणांची स्वॅब तपासणी करण्यात आली आहे.

गेल्या काही दिवसांपासून राज्यातील कोरोनाचा हॉटस्पॉट झालेल्या पुणे जिल्ह्यातील परिस्थिती आता बदलताना दिसत आहे. याठिकाणी कोरोनाची दुसरी लाट ओसरण्याचे संकेत मिळू लागले आहेत.

थोडक्यात बातम्या- 

केंद्राकडून गुजरातला एक हजार कोटींचं पॅकेज; वादळातील बळींच्या कुटुंबीयांना 2 लाख रूपयांची मदत जाहीर

‘राज्यात म्युकरमायकोसिसच्या रुग्णांवर मोफत उपचार होणार’; राजेश टोपेंची मोठी घोषणा

कोरोना लसीकरण नियमात मोठे बदल; वाचा सरकारने जारी केलेले नवे नियम

‘पंतप्रधान साहेब, खतांच्या किंमती कमी करा’; खासदार प्रीतम मुंडेंचं मोदींना पत्र

“सरकार पाण्यात बसलेल्या म्हशीसारखं, ढुसणी दिल्याशिवाय हलत नाही”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More