बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

शाब्बास पुणेकरांनो! पुण्यातील नव्या कोरोनाबाधितांच्या संख्येत लक्षणीय घट, वाचा दिलासादायक आकडेवारी

पुणे | पुण्यात कोरोनाबाधितांच्या संख्येमध्ये झपाट्याने वाढ होत असली तरी डिस्चार्ज देण्यात येणाऱ्या रूग्णांची संख्या देखील जास्त आहे. आनंदाची बाब म्हणजे आज पुण्यात नव्या रूग्णांची नोंद कमी अन् डिस्चार्ज दिलेल्या रूग्णांची संख्या जास्त आहे. राज्य सरकारने केलेल्या लॉकडाऊनचा फायदा होत असल्याचं या कमी झालेल्या संख्येवरून दिसत आहे.

पुण्यात आज दिवसभरात 254 पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ झाली आहे. तर दिवसभरात 221 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आज कोरोनामुळे 05 जणांना आपल्या प्राणाला मुकावं लागलं आहे.

पुण्यात सध्या 198 क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत. पुण्यात एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या 4,91,665 इतकी आहे. तर पुण्यात 2146 ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. आत्तापर्यंत एकूण 8874 जणांचा कोरोनामुळे मृत्यु झाला आहे. आजपर्यंत 4,80,687 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आज 9668 जणांची स्वॅब तपासणी करण्यात आली आहे.

दरम्यान, गेल्या काही दिवसांमागे दररोज नव्याने नोंद होणाऱ्या कोरोनाबाधितांची संख्या मोठ्या प्रमाणात होती. त्यादृष्टीने पुणे महानगरपालिका प्रशासनाने कडक पावलं उचललीत. त्यामुळे ही कमी झालेली आकडेवारी अशाच प्रकारे आणखी कमी व्हायला हवी.

थोडक्यात बातम्या-

‘गुन्हा दाखल करायचा असेल तर…’; खासदार संभाजीराजे भोसले कडाडले

शिवसेनेच्या ‘या’ बड्या नेत्याला भाजपमध्ये येण्यास नारायण राणेंची खुली ऑफर

राहुल गांधी म्हणजे देवाला सोडलेलं जनावर- रावसाहेब दानवे

महिला तहसीलदार ऑडिओ क्लिप प्रकरणात अण्णा हजारेंची उडी, म्हणाले…

“आपणच नियम करायचे आणि आपणच मोडायचे हे आमच्या रक्तात नाही”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More