Top News

अण्णा, आपण बाहेर पडू आणि या सरकारला गाडून टाकू!

अहमदनगर |  “या सत्ताधारी नालायकांसाठी जीवाची बाजी लावू नका, अण्णा आपण बाहेर पडू आणि या सरकारला गाडून टाकू”, असं म्हणत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे.

आज राज ठाकरे यांनी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची राळेगणसिद्धीत जाऊन भेट घेतली आणि त्यांच्या पक्षातर्फे अण्णांच्या आंदोलनाला संपूर्ण पाठिंबा दिला.

नरेंद्र मोदी आणि अरविंद केजरीवाल यांनी अण्णांचा वापर करून घेतला. हे निर्लज सरकार आहे, अशा शब्दात त्यांनी मोदी सरकारवर घणाघात केला.

दरम्यान, अण्णा हजारे यांना मोदींच्या कुठल्याही शब्दावर विश्वास ठेऊ नका पण आंदोलन जास्त ताणू नका, असं सांगितल्याचं राज यांनी यावेळी सांगितलं.

महत्वाच्या बातम्या-

मावळ लोकसभा लढवणार का?? पार्थ पवार म्हणतात…

“माझ्या बापाला काही झालं असेल तर मी त्याचा जीव घेईन”

उद्धव ठाकरे युतीचा निर्णय उद्या जाहीर करणार?? हालचालींना वेग

युतीसाठी भाजपकडून शिवेसेनेसमोर नवा फॉर्म्युला??

‘मास्तर धोनी’ चक्क मराठीतून मार्गदर्शन करतो तेव्हा…!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या