महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांची आजची आकडेवारी धडकी भरवणारी; जाणुन घ्या एका क्लिकवर
मुंबई | महाराष्ट्रात कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढतच असून परिस्थिती आटोक्यात येण्याची चिन्हं दिसून येत नाही. त्यातच भर म्हणून महाराष्ट्रात आज दिवसभरात 47 हजार 827 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. असून आतापर्यंतची एका दिवसातील विक्रमी वाढ रुग्णवाढीत झाल्याचं दिसुन येत आहे.
कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी राज्यात कडक निर्बंध लागू करणार असल्याचे स्पष्ट संकेत दिले. परंतु आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेशी संवाद साधताना येणाऱ्या 2 दिवसात लाॅकडाऊन किंवा कडक निर्बँधांबाबत निर्णय घेऊ असं स्पष्ट केलं.
महाराष्ट्रात एकुण 24 हजार 126 रुग्ण आज कोरोनामुक्त झाले असून आज पर्यंत बरे होणाऱ्यांची संख्या 24 लाख 57 हजार 494 एवढी झाली आहे. एकीकडे रुग्णसंख्या वाढत असतानाच दुसरीकडे रुग्ण बरे होण्याचं प्रमाणही कमी होऊन 84.62 टक्के झाल्याचं दिसुन येत आहे. महाराष्ट्रात सध्या एकूण 3 लाख 89 हजार 832 सक्रिय रुग्ण आहेत.
दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वारंवार महाराष्ट्रात लाॅकडाऊन करायला भाग पाडु नका असं सांगुनही आता लोक नियमांचं पालन करून कोरोना आटोक्यात आणण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. सध्या महाराष्ट्रातील काही शहरांमध्ये अंशतः लाॅकडाऊन करण्यात आलेला आहे. तसेच, आज पुण्यात मिनी लाॅकडाऊन घोषित करण्यात आला आहे, जो उद्यापासुन सुरू होऊन पुढचे 7 दिवस लागु असणार आहे. परंतु, आतातरी कोरोना आटोक्यात येणार का? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
थोडक्यात बातम्या –
पुण्यात कोरोना रुग्णांचा पुन्हा धक्कादायक आकडा, पाहा आजची आकडेवारी!
निवडणूका आहेत तिकडे कोरोना नाही का?, उद्धव ठाकरे म्हणाले…
तुम्हाला विनंती करतो, कृपा करा जनतेच्या जीवाशी खेळ होईल असं राजकारण करु नका- उद्धव ठाकरे
लाॅकडाऊन केलं तर रस्त्यावर उतरू म्हणणाऱ्या विरोधकांना उद्धव ठाकरेंनी झापलं, म्हणाले…
‘आज लॉकडाऊन जाहीर करत नाही, पण…’; उद्धव ठाकरेंचा जनतेला पुन्हा इशारा
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.