बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

आनंदाची बातमी! राज्यात आज नवीन रुग्णांपेक्षा कोरोनामुक्त रूग्णांची संख्या जास्त, 53 हजारांपेक्षा रूग्ण परतले घरी

मुंबई | राज्यात कोरोना रुग्णसंख्येत आता हळूहळू घट होत असल्याचं दिसून येत आहे. आज राज्यात  39,923 नव्या रुग्णांची नोंद झाली तर 53,249 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. राज्यात आजपर्यंत एकूण 47,07,980 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत.

राज्यात आज 695 कोरोना बाधित रुग्णाांच्या मृत्यूंची नोंद झाली असून सध्या राज्यातील मृत्यूदर 1.5 % एवढा आहे. राज्यात आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 3,06,02,140 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 53,09,215 नमुने पॉझिटीव्ह आले आहेत.

34,82,425 व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत, तर 28,312 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज रोजी एकूण 533294 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.  राज्यात आज एकूण 5,19,254 सक्रिय रुग्ण आहेत

दरम्यान, राज्य सरकारने राज्यातील लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. राज्य सरकारने 15 मे पर्यंत कडक निर्बंध लागू केले होते. यानंतर आता हे निर्बंध येत्या 1 जूनपर्यंत लागू राहणार आहेत. याबाबतचे परिपत्रक शासनाने जाहीर केलं आहे. यानुसार महाराष्ट्रात प्रवेश करणाऱ्या व्यक्तीकडे कोरोनाच्या आरटीपीसीआर चाचणीचा निगेटिव्ह अहवाल असणं आवश्यक आहे.

 

थोडक्यात बातम्या- 

‘या’ राज्यात लॉकडाऊनच्या सकारात्मक प्रभावामुळे सरकारने आणखी लॉकडाऊन वाढवला

“खिजगणतीत नसलेल्या पृथ्वीराज चव्हाणांना मोदी नॉन परफॉर्मिंग असेट वाटणं स्वाभाविक”

खरं का काय! कोंबडा बोलू लागला अल्लाह ,अल्लाह; पाहा तुफान व्हायरल व्हिडीओ

दिलासादायक बातमी! पुण्यात आज नव्या रूग्णांपेक्षा डिस्चार्ज दिलेल्या रूग्णांची संख्या जास्त!

ओव्हर एक्टिंगचे 50 कट! लस घेताना केलेल्या ड्रामामुळे मराठी अभिनेत्री झाली ट्रोल

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More