Top News देश

रिहानाचा ‘हा’ टाॅपलेस फोटो पाहून राम कदम संतापले, म्हणाले…

Photo Credit- Facebook/ Ram Kadam & Rihana

मुंबई | शेतकरी आंदोलनावर पॉप स्टार रिहानाने ट्वीट केल्यानंतर तिच्या ट्वीटने अख्खा देश ढवळून निघाला होता. यानंतर रिहाना चर्चेचा विषय बनली होती. तसेच पॉप सिंगर रिहाना तिची गाणी आणि फॅशन सेन्समुळे जास्त चर्चेत असते. मात्र सध्या ती तिच्या टॉपलेस फोटोमुळे चर्चेत आहे.

रिहाना कायमच सोशल मीडियावर तिचे विविध अंदाजातील फोटो व्हिडीओ शेअर करत प्रसिद्धी मिळवण्याचा प्रयत्न करत असते. आता पुन्हा एकदा रिहानाने सगळ्याचं लक्ष वेधून घेतलं आहे

रिहानाने लॉन्जरी ब्रँडसाठी फोटोशूट केलं आहे. या फोटोशूटमध्ये ती टॉपलेस पोज देताना दिसत आहे. तसेच रिहानाने तिच्या गळ्यात गणपतीचं पेडेंट घातल्याचं पाहायला मिळत आहे.

टॉपलेस फोटोमध्ये गणपतीचं पेडंट परिधान केल्याचं पाहून सोशल मीडियावर रिहानावर टीका करण्यात येत आहे. रिहानाच्या या फोटोवर भाजप नेते राम यांनी देखील आक्षेप घेत टीका केली आहे.

रिहानानं अर्धनग्न अवस्थेत गणपतीचं पेंडेंट परिधान करून हिंदू देवतांचा अपमान केलाय. आताही काँग्रेस रिहानाला पाठिंबा देणार का?, असा सवाल राम कदम यांनी काँग्रेसला विचारलाय.

 

 

थोडक्यात बातम्या- 

जेव्हा नाचायला लागली शालू… सोशल मीडियावर पोरं झाली चालू, पाहा व्हिडीओ

सावधान! पुणे जिल्ह्यात कोरोना पुन्हा पसरतोय हातपाय; पाहा सविस्तर आकडेवारी

‘या’ बॅंकांमध्ये तुमची खाती तर नाहीत ना?; ‘या’ चार बँकेचं होतयं खाजगीकरण

मुंबईतील नायर रुग्णालयात 26 वर्षीय डॉक्टरच्या आत्महत्येनं खळबळ!

विराट कोहलीला मोठा धक्का; होऊ शकते ‘ही’ मोठी कारवाई

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या