बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

आयपीएलआधीच शुभमन गिलचा ट्रेलर; 35 चेंडूत काढल्या एवढ्या धावा

मुंबई | आयपीएलमध्ये चौकार आणि षटकारांची फटकेबाजी पाहण्यास प्रेक्षक आतुर आहेत. याच आयपीएलचा 14 वा हंगाम येत्या 9 तारखेला सुरू होत आहे. आयपीएलमध्ये युवा खेळाडूंना मोठी संधी असते. मागील काही वर्षात भारतीय संघाला आयपीएलने अनेक खेळाडू दिले आहेत. नुकतचं आयपीएलमधून भारतीय संघात प्रवेश केलेल्या शुभमन गिलने आयपीएलआधी आपल्या खेळाचा ट्रेलर दाखवला आहे.

कोलकत्ता नाईट रायडर आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात सराव सामना पार पडला. यात कोलकत्ता नाईट रायडर्सचा सलामीचा खेळाडू शुभमन गिल याने आक्रमक खेळी करत 35 चेंडूत 76 धावा केल्या. तर युवा गोलंदाज वेंकटेश अय्यर याने 3 बळी घेतले, तर कमलेश नागरकोटी याने 2 बळी पटकावले.

शुभमनने आयपीएलच्या 41 सामन्यात 33.53 च्या सरासरीने 939 धावा केल्या आहेत. यामध्ये त्याने 7 अर्धशतक केलं. तर त्याच्या नावावर 87 चौकार आणि 24 षटकार आहेत. मागील हंगामात शुभमनने केकेआरसाठी मोठी खेळी केली होती. तर काही सामन्यात त्याने संघाला विजय देखील मिळवून दिला होता. त्यामुळे त्याला भारतीय संघात त्याला स्थान मिळालं होतं.

दरम्यान, कोलकत्ता नाईट रायडर्समध्ये दिग्गज खेळाडूची भरभराट आहे. इऑन माॅर्गन, दिनेश कार्तिक, ऑद्रे रसल, शुभमन गिल, राहुल त्रिपाठी, सुनिल नरेन, करूण नायर, रिंकू सिंग यांसारख्या फलंदाजांची मोठी फळी आहे. तर कमलेश नागरकोटी, लाॅकी फर्गुसन, प्रसिद्ध कृष्णा, वरूण चक्रवर्ती, शाकिब अल हसन यांसारखे गोलंदाज आहेत. तर कोलकत्ता नाईट रायडर्स यांचा पहिला सामना सनरायझर्स हैदराबाद यांच्याविरूद्ध होणार आहे.

थोडक्यात बातम्या-

अनिल देशमुखांच्या अडचणीत वाढ; CBI टीम आज मुंबईत येणार

‘राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना कळवण्यात येते की…’; शरद पवारांनी कार्यकर्त्यांना दिले ‘हे’ आदेश

“महाराष्ट्रातील घाणेरड्या राजकारणामुळे मला मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला”- संजय राठोड

“फडणवीस आणि राज ठाकरेंच्या आश्वासनानंतरच राज्यात मिनी लाॅकडाऊन लागू”

सोन्याच्या किमतीत वाढ; जाणुन घ्या आजचा महाराष्ट्रातील सोन्याचा दर

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More