बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

कलावंत राज ठाकरेंची इरफानला ‘शब्दसुमनांची’ आदरांजली!

मुंबई | आपल्या सहज सुंदर अभिनयाने प्रेक्षकांच्या काळजात घर करून राहिलेला अभिनेते इरफान खान यांनी अकाली एक्झिट घेतली. मुंबईतल्या कोकीलाबेन रूग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. इरफान खान यांच्या जाण्याने बॉलिवूडमध्ये खूप मोठी पोकळी निर्माण झाली आहे. विविध क्षेत्रातून मान्यनर मंडळी शोक व्यक्त करत आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी इरफानसाठी खास शब्दसुमनांची आदरांजली वाहिलीये.

राज ठाकरे म्हणतात, “शरीर सौष्ठव, चकचकीत चेहरा, नृत्याचं अंग नसलं तरी पडद्यावर जे अंगविक्षेप केले जातील त्याला नृत्य म्हणणं आणि अतर्क्य दिसणाऱ्या, वागणाऱ्या खलनायकांना संपवण्यासाठी अतर्क्य गोष्टी करणाऱ्या बॉलिवूड मधल्या नायकांचा काळ सुरु असताना इरफान खान सिनेमात भूमिका मिळाव्यात म्हणून धडपडत होता”.

“त्याची अभिनयाची सहज-सुलभता नसिरुद्दीन शाह, ओम पुरी आणि अजून मागे गेलं तर बलराज सहानी ह्यांच्या पठडीतली. पण ९० च्या दशकात मुळात हिंदी चित्रपट आणि अभिनय ह्यांच्यात फारकत असण्याचा काळ होता. ह्या वावटळीत पण इरफान इथे टिकून राहिला.”

“पुढे नव्या शतकात सिनेमातले अतर्क्य खलनायक मागे पडले आणि माणसातील उणिवा, महत्त्वाकांक्षा, ह्याही माफक का होईना खलनायकी असू शकतात ह्याची जाणीव नव्या दिग्दर्शकांना होत होती आणि त्यातून इरफानची ‘मकबूलीयत’ सुरु झाली. हिंदी चित्रपटसृष्टीच्या साचेबद्ध यशस्वी नटांच्या पठडीतलं आपल्याकडे काही नव्हतं ह्याची जाणीव इरफानला असावी आणि त्याची उणीव त्याने संवाद फेकीने, डोळ्यातून व्यक्त होण्याच्या ताकदीने भरून काढली. एखादं किडकिडीत व्यक्तिमत्व पण पडदा व्यापून टाकू शकतं, हे इरफानने दाखवून दिलं. सहज अभिनयाची परंपरा हिंदी चित्रपटसृष्टीत इरफानने प्रवाहित ठेवली.”

“इरफान लक्षात राहील कारण पडद्यावर तो वावरताना आपल्यातला प्रत्येक माणूस स्वतःला त्याच्याशी एकरूप करू शकायचा. ही एकरूपताच इरफानला दीर्घकाळ स्मरणात ठेवेल. माझ्या पक्षाची चित्रपट शाखा कलाकारांसाठी प्रामाणिकपणे काम करते, हेच इरफानना भावलं असणार आणि म्हणून त्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेनेचा सदस्यत्व स्वीकारलं असणार. अशा ह्या चतुरस्त्र अभिनेत्यास आणि सहकाऱ्यास भावपूर्ण श्रद्धांजली.”

ट्रेंडिंग बातम्या-

मुख्यमंत्र्यांनी राजीनामा देऊन बांगड्यांचं दुकान उघडलं पाहिजे- निलेश राणे

अमेरिकेने भारताला सीरियासारखी वागणूक दिली, मोदी ट्रम्प गळाभेट व्यर्थ गेली- असदुद्दीन औवेसी

महत्वाच्या बातम्या-

अभिनेता इरफान खानला कोणता आजार झाला होता?

परप्रांतीय मजूर, कामगार विद्यार्थी तसंच पर्यटकांना आता आपल्या घरी जाता येणार; केंद्राचा मोठा निर्णय

इरफानसोबत शेवटचा सिनेमा करणाऱ्या ‘या’ तिघांच्या बोलक्या प्रतिक्रिया!

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More