बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

CDS बिपीन रावतांच्या निधनावर पाकिस्तानने दिली ‘ही’ प्रतिक्रिया

नवी दिल्ली | सीडीएस बिपीन रावत यांच्या अपघाती निधनाने संपूर्ण देशावर शोककळा पसरली आहे. सर्व भारतीय वेगवेगळ्या माध्यमांतून रावत यांना श्रद्धांजली वाहत आहेत. इतर देशांनीही बिपीन रावत यांच्या निधनाबद्दल दुख: व्यक्त करत त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. आता पाकिस्ताननेही बिपीन रावातांच्या निधनावर प्रतिक्रीया दिली आहे.

रशिया, इस्त्राईल, श्रीलकां, भूटान या देशांच्या पतप्रधांनानी बिपीन रावतांना श्रद्धांजली वाहिली आहे. तर पाकिस्ताननेही ट्विट करत रावत यांच्या निधनाबद्दल दुख: व्यक्त केलं आहे. पाकिस्तानी सैन्याने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरून सीडीएस बिपीन रावत आणि त्यांच्या पत्नीच्या मृत्यूबद्दल संवेदना व्यक्त केल्या आहेत.

या ट्विटमध्ये पाकिस्तानने म्हटलं आहे, “जनरल नदीम रजा, जनरल कमर जावेद बाजवा आणि चीफ ऑफ द आर्मी स्टाफ यांच्याकडून हेलिकॉप्टर क्रॅशमध्ये सीडीएस बिपीन रावत आणि त्यांच्या पत्नीच्या दुर्दैवी निधनाबद्दल श्रद्धांजली.” पाकिस्तानबरोबरच अमेरीकेनही बिपीन रावत यांच्या निधनाबद्दल हळहळ व्यक्त केली आहे.

दरम्यान, भारताचा चांगला मित्र असलेल्या इस्त्राईलनेही रावतांना श्रद्धांजली वाहिली आहे. इस्त्राईलचे दुत नाओर गिलोन यांनी यांनी ट्विट करत बिपीन रावत यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. त्यांनी म्हटलं आहे, की “बिपीन रावत हे एक उत्तम प्रमुख आणि इस्त्राईलचे चांगले मित्र होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि तमाम भारतीयांना हे दुख: सहन करण्याची ताकद मिळो,” अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या आहेत.

 

थोडक्यात बातम्या-

”जनरल बिपीन रावत यांची अपूर्व सेवा भारत कधीच विसरणार नाही”

सीडीएस जनरल बिपीन रावत यांच्या पार्थिवावर उद्या अंत्यसंस्कार

सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर! पंतप्रधान नरेंद्र मोदीही वापरतात ‘हे’ हेलिकॅाप्टर

‘..तरी ठाकरे सरकारच्या अहंकारापुढे झुकणार नाही’; आशिष शेलार आक्रमक

‘काय नाव होतं त्यांचं, काय ते’; बिपीन रावतांना श्रद्धांजली देतानाचा सदावर्तेंचा व्हिडीओ व्हायरल

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More