बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

”भाजपला 3 वर्षात देशाबाहेर हाकलून लावायचं माझं लक्ष्य आहे”

नवी दिल्ली | केंद्रात 2014 साली लोकसभा निवडणुकीत भाजपने एकहाती सत्ता मिळवली. त्यानंतर आलेल्या मोदी लाटेने 2019 चीही लोकसभा निवडणुक जिंकली आणि नरेंद्र मोदी दुसऱ्यांदा भारताचे पंतप्रधान झाले. सध्या अनेक राज्यात भाजपची सत्ता आहे. पश्चिम बंगालमध्ये पोट निवडणुकांसाठी निवडणुक होत आहेत. त्या निवडणुकांच्या प्रचारादरम्यान तृणमूल काॅंग्रेसने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला.

येत्या 3 वर्षात भाजपला देशाबाहेर हाकलून लावायचं माझं लक्ष्य आहे. मी भाजपच्या प्रत्येक मतदारसंघात जाईल आणि तिथून त्यांना हाकलून लावेन. त्यांच्या ईडी आणि सीबीआय माझं काय करून घेणार आहेत? आम्ही भाजपचं अस्तित्व असलेल्या प्रत्येक राज्यात जाऊ, असं वक्तव्य तृणमूल काँग्रेसचे खासदार अभिषेक बॅनर्जी यांनी केलं आहे. ते पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या भवानीपूर मतदारसंघात निवडणुकीचा प्रचार करीत होते.

पश्चिम बंगालमधील मुर्शिबाद-समशेरगंज आणि जांगीपूर या दोन ठिकाणी 30 सप्टेंबर रोजी पोटनिवडणुकीसाठी मतदान होणार आहे. त्या ठिकाणी विधानसभा निवडणुकांदरम्यानच उमेदवाराच मृत्यू झाला. त्यामुळे त्या मतदारसंघातील निवडणुक स्थगित करण्यात आली होती. आता त्या निवडणुकांसाठी प्रचार सुरू झाला आहे.

दरम्यान, भाजप विकास हा फक्त नावं बदलण्यापर्यंतच मर्यादित आहे. जर ते इथे जिंकले असते, तर मुर्शिदाबादचं नामकरण मोदीशाहबाद झालं असतं, अशीही टीकाही अभिषेक बॅनर्जी यांनी मोदींवर केली आहे.

थोडक्यात बातम्या-

“महिला सुरक्षेबाबत भाजपच्या पदाधिकाऱ्यांची विशेष कार्यशाळा घ्या, महाराष्ट्रातील महिला सुरक्षित रहातील”

धक्कादायक! कल्याणमध्ये शिक्षकाने 8 वर्षाच्या चिमुकलीवर केला लैंगिक अत्याचार

काढणीस आलेल्या सोयाबीनचे दर घसरल्याने शेतकरी संतापले; सोशल मीडियावर पसरतोय #सोयाबीन ट्रेंड!

“किरीट सोमय्यांनी शरद पवारांवरील आरोप थांबवावे, नाहीतर…”

काॅंग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद रणपिसे यांची प्राणज्योत मालवली, उद्या होणार अंत्यसंस्कार

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More