Top News महाराष्ट्र मुंबई

इंदुरीकर प्रकरण: मला अश्लील शिवीगाळ होत असताना महिला नेत्या गप्प का?- तृप्ती देसाई

Loading...

मुंबई | काही दिवसांपूर्वी ह.भ.प. इंदुरीकर महाराज देशमुख यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे मोठा वादंग निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्ष तृप्ती देसाई यांनी इंदुरीकर महाराजांवर कडवट टीका केली होती. या प्रकरणावरुन शिवीगाळ आणि धमक्या येत असल्याचं सांगत देसाई यांनी महिला नेत्यांना सवाल केला आहे.

इंदुरीकर महाराज प्रकरणात माझ्यावर जो अश्लील शिवीगाळ होत आहे, धमक्या येत आहेत, शिवसेनेच्या महिला पदाधिकाऱ्यांकडून मला मारण्याची भाषा केली जात आहे. तसेच इंदुरीकर महाराजांचे समर्थक माझ्याबद्दल घाणेरडी भाषा वापरत आहेत. याबाबत सुप्रियाताई सुळे, नीलमताई गोऱ्हे, यशोमतीताई ठाकूर, चित्राताई वाघ काही जाहीररीत्या बोलणार आहेत का नाही?.. का त्यांना मान्य आहे हे सगळे?, असा संतप्त सवाल तृप्ती देसाई यांनी केला आहे.

Loading...

आधी संभाजी भिडे आणि आता इंदुरीकर महाराज. स्त्रियांबद्दल असं बेताल वक्तव्य करणाऱ्यांच्या मुसक्या आवळल्या गेल्या पाहिजेत. त्यामुळे इंदुरीकरांवर गुन्हा दाखल झाला नाही तर आम्हाला रस्त्यावर उतरणार असल्याचं म्हणत देसाई यांनी टीका केली होती.

दरम्यान, सुप्रियाताई सुळे, नीलमताई गोऱ्हे, यशोमतीताई ठाकूर, चित्राताई वाघ यावर काही बोलतात का हे पाहावं लागेल.

Loading...

ट्रेंडिंग बातम्या-

“भाजप सरकारने केलेल्या चुका महाविकास आघाडीला दुरूस्त कराव्या लागतील”

इंदुरीकर महाराजांचा झटका; एकाच इशाऱ्यात यूट्यूब चॅनेलवाल्यांनी व्हिडीओ उडवले!

महत्वाच्या बातम्या-

Loading...

शंभूराजेंच्या समाधीवर माथा टेकवताच अमोल कोल्हेंना अश्रू अनावर!

मनसेचे काही कार्यकर्ते गद्दार आहेत- राज ठाकरे

जगात पहिला क्रमांक माझा, त्यानंतर मोदींचा; डोनाल्ड ट्रम्प यांचं ट्वीट

Loading...
Loading...

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या