शनिदेव आणि हाजीअलीनंतर तृप्ती देसाईंचं मिशन नांगरे-पाटील!

सांगली | शनिदेव आणि हाजीअली दर्गातील महिला प्रवेशाच्या मोहिमेनंतर तृप्ती देसाईंनी मिशन नांगरे-पाटील हाती घेतल्याचं दिसतंय. अनिकेत कोथळे हत्या प्रकरणी विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील यांची बदली करावी, अशी मागणी त्यांनी केलीय. 

तृप्ती देसाई यांनी अनिकेतच्या कुटुंबियांची भेट घेऊन त्यांचं सांत्वन केलं. त्यानंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी गृहखात्याच्या कारभाराचे अक्षरशः वाभाडे काढले. 

पोलीस उप-अधीक्षक दिपाली काळे यांची जबाबदारी निश्चित करुन त्यांना अटक करावी, तसेच पोलीस अधीक्षक दत्तात्रय शिंदे यांची तात्काळ बदली करावी, अशी मागणीही त्यांनी केलीय. अन्यथा पोलीस ठाण्यासमोर धरणे आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिलाय.