बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

…म्हणून महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू होण्याची शक्यता- तृप्ती देसाई

पुणे | कोरोना पेशंटची वाढती संख्या पाहता महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागण्याची शक्यता नाकारता येणार नाही, असं भूमाता ब्रिगेडच्या संस्थापक तृप्ती देसाई यांनी म्हटलं आहे.

4 मे ला दारूची दुकानं सुरू केल्यापासून गर्दीमुळे ही संख्या मोठ्या प्रमाणात वाढत गेली तसेच राज्यात गुन्हेगारीचं प्रमाणही वाढत चाललं आहे. महाराष्ट्रात एकाच दिवशी तीन हजाराहून जास्त पेशंट सापडत आहेत, असं तृप्ती देसाईंनी सांगितलंय.

ज्या पद्धतीने कोरोनाचे पेशंट वाढत आहेत असेच पेशंट जर पुढील दहा दिवसात वाढत राहिले तर राज्य सरकारला ही परिस्थिती नियंत्रणात आणता येणार नाही. म्हणून राष्ट्रपती राजवट लागण्याची शक्यता महाराष्ट्रात नाकारता येणार नाही, असं तृप्ती देसाई म्हणाल्या आहेत.

दरम्यान, आपल्या देशात कोरोनाचे पेशंट महाराष्ट्र राज्यात सर्वात जास्त आहेत. महाराष्ट्रात सध्या 50 हजाराहून जास्त कोरोनाच्या पेशंटची संख्या झाली आहे. तसेच मृत्यूचं प्रमाणही दीड हजारापेक्षा जास्त आहे.

ट्रेंडिंग बातम्या-

आमच्या विरोधात काही करण्याची हिंमत केली तर…; पाकिस्तानची भारताला धमकी

पियुषजी, राज्यसभेत आपण महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व करताय विसरु नका- संजय राऊत

महत्वाच्या बातम्या-

मजुरांनंतर आता राहुल गांधी यांनी केली टॅक्सी चालकाशी चर्चा

मुख्यमंत्री सरकार चालवण्यात सक्षम नाही, राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करा; राणेंची राज्यपालांकडे मागणी

“महाराष्ट्रात मजुरांनी उद्धव ठाकरे जिंदाबादच्या घोषणा दिलेल्या योगी आदित्यनाथांना आवडलं नसेल”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More