अहमदनगर महाराष्ट्र

संजय राऊतांनी कंगणाची माफी मागावी- तृप्ती देसाई

अहमदनगर | अभिनेत्री कंगणा राणावतवर टीका करताना शिवसेना नेते संजय राऊत यांनी ‘हरामखोर मुलगी’ या शब्दाचा उल्लेख केल्यामुळे त्यांच्यावर टीकेची झोड उठवण्यात येत आहे. राऊत यांनी केलेल्या वक्तव्यावर भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

संजय राऊत यांनी कंगणा राणावतविषयी काल अपशब्द वापरले आणि माफी मागायला ते तयार नाहीत. मात्र तातडीने संजय राऊत यांनी कंगणा राणावत यांची माफी मागितली पाहिजे, असं तृप्ती देसाई यांनी म्हटलं आहे.

कंगणा राणावत यांनी मुंबई सुरक्षेबाबत ट्विट केलं होतं. त्यांना अभिव्यक्त स्वातंत्र्य आहे, त्यामुळे त्या व्यक्त झाल्या. मात्र त्यानंतर त्यांना विरोध सुरू झाला. कंगना राणावत यांचे ट्विट चुकीचं होतं, तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई ही झालीच पाहिजे, असं तृप्ती देसाई म्हणाल्यात.

अशा पद्धतीचे शब्द वापरणं म्हणजे महिला सन्मानावर आघात करण्यासारखंच आहे. ज्या महाराष्ट्रात महिलांचा सन्मान केला जातो, तेथे अशा पद्धतीने एका खासदाराने वक्तव्य करणं हे पूर्णपणे चुकीचं आहे, असं तृप्ती देसाईंनी म्हटलं आहे.

महत्वाच्या बातम्या-

IPL चं वेळापत्रक जाहीर, या दोन संघांमध्ये रंगणार सलामीचा सामना

“हाय प्रोफाईल पार्ट्यांमध्ये कलाकार सर्रास ड्रग्जचं सेवन करतात”

“दाऊदच्या सात पिढ्या आल्या तरी मातोश्रीचं काही वाकडं करु शकणार नाही”

‘एकजूट होऊन कोरोनाशी लढूया’; ‘या’ भाजप नेत्याचं मुंख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र

खळबळजनक! दाऊद इब्राहिमच्या नावे मुख्यमंत्र्यांना फोन, ‘मातोश्री’ उडवण्याची दिली धमकी

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या