बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“आज महाराज असते तर धनंजय मुंडे, मेहबूब शेख, संजय राठोड यांचा कडेलोट केला असता”

मुंबई | राज्यातील नेत्यांवर बलात्काराचे आरोप तर काहींवर फसवणुकीचा आरोप होत आहे. सध्या चर्चेत असलेल्या पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणामध्ये शिवसेनेचे नेते आणि वन मंत्री संजय राठोड यांचं नाव जोडलं जात आहे. तर राष्ट्रवादीचे युवक प्रदेश अध्यक्ष यांच्यावरही एकी मुलीने बलात्काराचा आरोप केला आहे. याआधी राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री धनंजय मुंडेंवरही रेणू शर्मा या तरूणीने बलात्काराचा आरोप केला होता. याच पार्श्वभूमीवर भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्ष तृप्ती देसाई यांनी शिवजयंतीच्या दिवशी पोस्ट करत या नेत्यांवर निशाणा साधला आहे.

आज छत्रपती शिवराय असते तर धनंजय मुंडे, मेहबूब शेख आणि संजय राठोड यांच्यावर कठोर कारवाई झाली असती कदाचित कडेलोटच केला असता. कोणतंही प्रकरण दाबलं गेलं नसतं आणि सर्वांना समानच न्याय मिळाला असता, असं म्हणत तृप्ती देसाई यांनी महाविकास आघाडीतील नेत्यांवर निशाणा साधला. यासंदर्भात देसाईंनी फेसबुक पोस्ट केली आहे.

कोपर्डीतील आणि देशातील सर्वच पीडितांना तात्काळ न्याय मिळाला असता. महिलांकडे वाईट नजरेने बघण्याची कोणाची हिंमतच झाली नसती. आज महाराज नाहीत त्यामुळे तक्रार करणाऱ्या महिलांनाच बदनाम करणारी टोळी तयार होत असून महिला सन्मान फक्त कागदोपत्री असल्याचं तृप्ती देसाई म्हणाल्या.

दरम्यान, बलात्काराचे आरोप असणारे सुद्धा आणि त्यांना पाठीशी घालणारे सुद्धा आज शिवजयंती साजरी करत आहेत. आज “राज्यशासन पेक्षा छत्रपती शासन” हवं होतं असंच वाटतंय, असं तृप्ती देसाई यांनी म्हटलं आहे.

थोडक्यात बातम्या-

मी कंबर हालवत बसत नाही तर सरळ हाडं तोडते- कंगणा राणावत

15 कोटी म्हणजे किती रे भाऊ?, स्वतःवर लागलेली बोलू ऐकून त्याला पडला प्रश्न!

चंद्रकांत पाटलांच्या ‘त्या’ अजब वक्तव्याचा नवाब मलिकांकडून समाचार, म्हणाले…

पूजा राठोड प्रकरणात आणखी एक धक्कादायक माहिती, चुलत भावाला वनखात्यात चिटकवलं?

‘या’ भाजप नेत्याची एसआयटी चौकशी करा; सुप्रिया सुळे यांची मागणी

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More