पुणे | राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब इब्राहिम शेख यांच्या विरोधात औरंगाबादमध्ये 26 डिसेंबर 2020 रोजी बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यावेळी विरोधी पक्षाने शेख यांना अटक करण्याची मागणी केली होती. मात्र काही दिवसांनी तक्रारदार पीडित तरूणी गायब झाल्याची माहिती समोर आली होती. त्यानंतर हे प्रकरण शांत झालं होतं. परंतू अशातच पीडीत तरूणीने भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई यांच्यासह पत्रकार परिषद घेत राज्य सरकारला आत्महत्या करण्याचा इशारा दिला आहे. याच पार्श्वभूमीवर देसाई यांनी शेख यांच्यावर टीका केली आहे.
गुन्हा दाखल होऊन सव्वा महिना उलटला पण अद्याप आरोपीला अटक नाही. मेहबूब शेख यांनी पीडित तरुणीला जबरदस्तीने गाडीत बसवून बलात्कार केला आहे. अशावेळी सर्वसामान्य लोक आणि सत्ताधारी पक्षातील पदाधिकारी, मंत्र्यांसाठी कायदा समान नाही का?, असा सवाल तृप्ती देसाई यांनी केला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून पीडितेला त्रास देण्याचा प्रयत्न केला जात आहे. या मुलीने काही बरं वाईट केलं तर त्याला मेहबूब शेख जबाबदार असतील, असंही देसाई यांनी म्हटलं आहे. यावेळी त्यांनी राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे आणि पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणावरून राज्य सरकारवर टीका केली आहे.
दरम्यान, मला न्याय मिळाला नाही तर मी पाच दिवसाच्या आत आत्महत्या करणार. इतकंच नाही तर माझ्या आत्महत्येला मेहबूब शेख जबाबदार असतील, असं संबंधित पीडितेने म्हटलं आहे. या प्रकरणाची राज्य सरकार दखल घेतं की नाही हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
थोडक्यात बातम्या-
“शिवसेना-काॅंग्रेस-राष्ट्रवादीसाठी स्त्री-दाक्षिण्य केवळ भाषणात बोलायचे मुद्दे”
राज्यात पुन्हा लॉकडाऊन पडणार का?; राजेश टोपे म्हणाले….
राज्यपालांनी एकही असंवैधानिक कृत्य केलेलं नाही- देवेंद्र फडणवीस
‘आमच्या वाटेला जाल तर…’; राणे समर्थकांचा विनायक राऊतांना इशारा
…नाहीतर काँग्रेस लवकरच इतिहास जमा होईल- चंद्रकांत पाटील