अहमदनगर | 31 डिसेंबरपर्यंत फलक हटवला नाहीतर, आम्ही पुन्हा शिर्डीत येऊन आंदोलन करू, असा इशारा भूमाता ब्रिगेडच्या नेत्या तृप्ती देसाई यांनी शिर्डी संस्थानास दिला आहे.
शिर्डी येथील साई संस्थानने महिलांच्या ड्रेसकोडाबाबत लावलेला फलक हटवण्यासाठी भूमाता ब्रिगेडच्या नेत्या तृप्ती देसाई यांना आज सकाळी पुण्याहून शिर्डीकडे जाताना, नगरच्या सीमेवर सुपे टोलनाक्याजवळ पोलिसांनी रोखलं आणि ताब्यात घेतलं होतं. यावेळी देसाई यांनी माध्यमांशी संवाद साधताना आम्ही शिर्डीला जाण्यावर ठाम आहोत अशी भूमिका मांडली होती.
तुमच्या जीविताला धोका असल्याने शिर्डीला तुम्हाला जाता येणार नाही, असं सांगून या आम्हाला आता सोडण्यात आलेलं आहे, असं तृप्ती देसाई यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं.
जिथं साईबाबांनी सबका मालिक एक आहे असं सांगितलं. तिथं महिलांना अटक झाल्यावर जर कुणी जल्लोष करत असेल, तर मला असं वाटतं की महिलांचा अपमान करणारी मानसिकता अजूनही शिर्डीत आहे किंवा विरोध करणाऱ्यांमध्ये आहे. हीच मानसिकता बदलण्यासाठी आमचं आंदोलन आहे, असं तृप्ती देसाई म्हणाल्यात.
थोडक्यात बातम्या-
गायिका कार्तिकी गायकवाडचं शुभमंगल सावधान; पाहा लग्नातील निवडक फोटो
नवनीत राणांचं रावसाहेब दानवेंना जोरदार प्रत्युत्तर, म्हणाल्या…
सध्या राष्ट्राचं नेतृत्व करण्याची क्षमता जर कुणामध्ये असेल तर ती…- संजय राऊत
केंद्र सरकारने कृषी कायदे रद्द करावेत, नाही तर…- नाना पटोले
सुधीर मुनगंटीवार यांच्याकडून दानवेंची पाठराखण, म्हणाले…