बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

तुषार भोसलेंची जीभ घसरली, शरद पवारांवर पातळी सोडून टीका

मुंबई | गेल्या अनेक दिवसांपासून भाजप आध्यात्मिक आघाडीचे नेते तुषार भोसले महाविकास आघाडी सरकारवर टीका करत आहेत. मंदिरं उघडण्यावरून ठाकरे सरकारवर हल्लाबोल केला होता. मात्र, आता व्यसनमुक्तीवरून राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यात खालच्या पातळीवरून टीका केली आहे.

व्यसनाधीनतेमुळे ज्या पक्षाच्या दस्तरखुद्द राष्ट्रीय अध्यक्षांचे तोंड कापावं लागलं, त्यांच्या प्रवक्त्याकडून नशामुक्तीचे समर्थन कसे केले जाईल, अशी खालच्या स्तरावरील टीका तुषार भोसले यांनी केली आहे. वो तो बस अपने ‘मालिक’ का धर्म निभा रहा है, असं तुषार भोसले यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.

जेव्हा देशात कोरोनाचा उद्रेक झाला होता आणि वारंवार लॉकडाऊन करावे लागत होते तेव्हा माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी देशातील मंदिरांमधील सोनं कर्जाऊ घेण्याचा सल्ला दिला होता. तेव्हा तुषार भोसले यांनी पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर टीका केली होता. यावरून तुषार भोसले कोण आहे? असा प्रश्न पृथ्वीराज चव्हाण यांनी केला होता. त्यावर तुषार शालिग्राम भोसले हे माझं नाव  असून शास्त्री आणि आचार्य पदवी संपादन केली आहे, असं तुषार भोसले यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, राष्ट्रवादीच्या कोणत्याही नेत्याने शरद पवारांवरील  टीकेवर अजुन प्रत्युत्तर दिलेलं नाही. सद्यस्थितीत राज्यात आर्यन खान ड्रग्ज प्रकरणावरून वाद सुरू आहे.त्यातच आता तुषार भोसले यांनी टीका केल्यामुळे पुन्हा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

थोडक्यात बातम्या- 

“सिद्धूंना काही कळत नाही, ते जास्त बोलतात पण त्यांना मेंदू नाही”

‘देशाला स्वातंत्र्य 99 वर्षांच्या भाडेतत्वावर मिळालंय’; भाजप प्रवक्त्याचा जावईशोध

शासनाचा सावळा गोंधळ! दिवाळी सुट्ट्यांची तारीख अचानक बदलली

“एकनाथ खडसे स्वत:ला मुख्यमंत्रिपदाच्या पातळीचे समजायचे मग पराभव का झाला?”

मोठी बातमी! नीरज चोप्रासह अन्य 11 खेळाडूंची खेलरत्न पुरस्कारासाठी शिफारस

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More