महाराष्ट्र मुंबई

‘एका वर्षात दोनदा सुतक लागणं हे हिंदू शास्त्रानुसार चांगलं नाही’; शिवसेनेचा भाजपला टोला

मुंबई | राज्यातील पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत महाविकास आघाडीने भाजपला धूळ चारली. यावरून शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या ‘सामना’मधून शिवसेनेने भाजपचा समाचार घेतलाय.

वर्षभरापूर्वी 105 आमदार येऊनही सत्ता गेली. तेव्हापासून महाराष्ट्र भाजपास सुतक लागलं. कालच्या नागपूर-पुण्यातील पराभवाने आणखी एक सुतक लागलं. एका वर्षात दोनदा सुतक लागणं हे हिंदू शास्त्रानुसार चांगलं नाही, असा टोला शिवसेनेनं भाजपला लगावलाय.

पदवीधर, शिक्षक मतदारसंघ म्हणजे भारतीय जनता पक्षाचीच मक्तेदारी होती. शिकले-सवरलेले, सुशिक्षित, सारासार विचार करणारे मतदार हे भाजपलाच मतदान करतात या भ्रमाचा भोपळा आता फुटला आहे, असं शिवसेनेनं आग्रलेखात म्हटलंय.

विधान परिषदेच्या सहापैकी सहा जागा जिंकू, अशा आरोळय़ा चंद्रकांत पाटील ठोकत होते. शरद पवार हे लोकनेते नाहीत असे बोलण्यापर्यंत त्यांची मजल गेली तेव्हा लोकांनीच त्यांना खाली पाडले, अशी टीका शिवसेनेनं केलीये.

महत्वाच्या बातम्या-

तामिळनाडूतील जिंजी किल्ल्यास जतन आणि संवर्धनासाठी मुख्यमंत्र्यांकडून 50 लाख रुपये जाहीर!

राज्यात रक्ताची टंचाई, जनतेने स्वयंस्फूर्तीने पुढे येऊन रक्तदान करावं- उद्धव ठाकरे

अन्वय नाईक आत्महत्येप्रकरणी आरोपपत्र दाखल, अर्णव गोस्वामींसह 2 जणांविरोधात गंभीर आरोप

“यापुढे राज्यातील भाजप नेत्यांनी झेपेल तितकंच बोलावं”

शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी बच्चू कडू दुचाकीवरून दिल्लीकडे रवाना!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या