बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

देवेंद्र फडणवीस- जितेंद्र आव्हाड यांच्यात रंगलं ट्विटर वाॅर; कारण ठरले अनिल देशमुख

मुंबई | गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर काही दिवसांपूर्वी भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप झाले होते. त्यावरून राज्य सरकारने चौकशीसाठी समिती गठित केली होती. या चौकशी समितीवर राज्यातील विरोधी पक्षाने आक्षेप घेतले होते. त्यावरून आता विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करत सरकारवर टिकास्त्र सोडलं. त्याला उत्तर देण्यासाठी कॅबिनेटमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी पुढाकार घेतला आणि नंतर फडणवीस-आव्हाड ट्विटर वाॅर पाहायला मिळालं.

राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरोधातील आरोपांची चौकशी करण्यासाठी गठीत करण्यात आलेल्या न्या. के. यू. चांदीवाल समितीला साध्या समितीचा दर्जा देण्यात आला असून, न्यायालयीन आयोगाचे अधिकार देण्यात आलेले नाहीत. कमिशन्स ऑफ इन्क्वायरी अ‍ॅक्ट 1952 अंतर्गत ही समिती गठीत करण्यात आलेली नाही. आमच्या काळात न्या. झोटिंग समिती गठित करताना त्यांना या कायद्यांतर्गत सर्व अधिकार प्रदान करण्यात आले होते. त्यामुळे ही समिती म्हणजे निव्वळ धूळफेक आहे आणि या प्रकरणातील आरोपांची तीव्रता आणि गांभीर्य लक्षात घेता,त्यातून कोणताही हेतू साध्य होणार नाही, असं फडणवीस म्हणाले.

यावर जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट करत उत्तर दिलं. झोटींग समितीला कमिशन्स ऑफ इन्क्वायरी अ‍ॅक्ट अन्वये चौकशी करा, असे एखादे तरी आपल्या शासनाचे पत्र दाखवावे, असं जितेंद्र आव्हाड म्हणाले. तत्कालीन महसूल मंत्री श्री. एकनाथ खडसे यांच्यावर जमीन व्यवहारासंबधी लावण्यात आलेली न्यायमूर्ती बी. एस. झोटींग कमिटी आणि अनिल देशमुख यांच्यावर झालेल्या आरोपासंबधी लावण्यात आलेली के. यु. चांदीवाल कमिटी यांच्या परिपत्रकामध्ये एक शब्दाचेही अंतर नाही, असं प्रत्युत्तर आव्हाडांनी दिलं.

दरम्यान, माझे परममित्र जितेंद्र आव्हाड जी, मुख्य सचिवांचा अहवाल कुणी लिहिला, हे काही आपण उगाच सांगत नव्हतो. वाट पाहत होतोच आणि अपेक्षित परिणाम साधला गेला. असो, हा घ्या आपल्याला हवा असलेला कागद!, असं म्हणतं फडणवीसांनी पुरावा सादर केला. यावर, हे पत्र आपण पाच महिन्यांनी काढले …आत्ता घाई का करता आहात, असं म्हणतं तिसरं ट्विट आव्हांडांनी केलं.

पाहा ट्विट्स-

 

 

थोडक्यात बातम्या-

‘वाघांच्या राज्यात लांडग्यांची चलती कशी?’; प्रकाश आंबेडकरांचा मुख्यमंत्र्यांना सवाल

कोरोना लसीबाबत चिंता वाढवणारी बातमी; जगभरातील तज्ज्ञांच्या सर्व्हेने एकच खळबळ

पुण्यात एकाच दिवशी 1 लाख नागरिकांना कोरोना लस, सुप्रिया सुळेंनी दिली महत्त्वाची माहिती

लग्नानंतर नवरी स्वतःच गाडी चालवत पोहोचली सासरी; व्हिडीओ तुफान व्हायरल

आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची मोठी घोषणा, कोरोना चाचण्याचे दर केले कमी

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More