टॅक्सी सेवेसोबतच उबर आता फूड डिलिव्हरीही करणार

मुंबई | टॅक्सी सेवा पुरवणाऱ्या उबर कंपनीने फूड डिलिव्हरी करण्याचा निर्णय घेतला आहे. आजपासून मुंबईत ही सेवा सुरु करण्यात आली. उबरईट्स असं या सेवेचं नाव आहे. उबरईट्सचे प्रमुख भाविक राठोड यांनी ही माहिती दिली.

सर्वप्रथम २०१४ मध्ये लॉस एंजिलिसमध्ये हा उपक्रम सुरु करण्यात आला होता. त्यानंतर गेल्या जानेवारी महिन्यात २६ देशांमध्ये या सेवेचा विस्तार करण्यात आला. भारतात सध्या फक्त मुंबईतच ही सेवा देण्यात येत असून हळूहळू तिचा विस्तार केला जाईल.

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

तुमच्या पसंतीच्या बातम्या