बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“पहाटेचा शपथविधी यशस्वी न होणं हीच फडणवीसांची खंत”

औरंगाबाद | युती केली ही चूक झाली. युती नसती तर भाजपच्या 150 प्लस जागा आल्या असत्या, असं वक्तव्य विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केलं. यावरून उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी फडणवीसांना टोला लगावला आहे.

देवेंद्र फडणवीस यांना पहाटेचा शपथविधी यशस्वी झाला नाही ही खंत असल्याचा टोला उदय सामंत यांनी लगावला आहे. औरंगाबादमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी त्यांनी अनेक विषयांवर भाष्य केलं.

उदय सामंत यांनी यावेळी बोलताना नाणार प्रकल्पाबाबतही शिवसेनेची भूमिका स्पष्ट केली. नाणार प्रकल्प कोणत्याही परिस्थितीत होऊ देणार नाही ही भूमिका मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतल्याचं सामंत यांनी सांगितलं आहे.

उद्धव ठाकरे हे शिवसेना पक्षप्रमुखही आहेत. त्यांनी नाणारबाबत याआधीच भूमिका स्पष्ट केली आहे. त्यामुळे शिवसेना आजही त्या भूमिकेवर कायम आहे, असं सामंत म्हणाले.

महत्वाच्या बातम्या-

“मराठा समाजाचा सरसकट ओबीसीत समावेश करा”

मुंबईतील 144 कलम हे कोरोनामुळे नव्हे, तर…- चंद्रकांत पाटील

सलामीचा सामना खेळण्याआधी चेन्नईच्या संघाला दिलासा; ऋतुराजचा पहिला कोरोना अहवाल निगेटीव्ह

ड्रग्सप्रकरणी ABCD फेम अभिनेता किशोर शेट्टीला अटक

“शिवसेनेचं मुंबईवरील बेगडी प्रेम उघड?, मरिन ड्राइव्हच्या किनाऱ्याला ढोंगीपणाचा गाळ दिसला”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More